writing is not only my passion but also best Source of Express my feelings...#small try for most of ladies suffering situation #

जान बुजके पास लाने से अच्छा ,
पसंद की दुरी अच्छी है!! 😊💯

यार...
हिच्या बद्दल काय बोलावं हे कधी
सुचलं नाही
पण तिच्या बद्दल लिहल्याशिवाय
रहावलं नाही ....
वेगळीच आहे ही मुलगी
जर कोणी आवडला तर जीव लावेल
आणि हा कोणाशी खटकल तर
तोंड बघायचं बंद करेल !!

हा पण
तिने जीव लावून समोरच्या ला
कळलं नाही तर
तिथून आपोआप कस दूर व्हायचं
हे फक्त तिलाच कळत...
आणि जर कोणी तिच्याशी
थोड का होईना बोललं
तर किती ही खटकु दे
स्वतःहून जवळ कस करायच
हे तिला चांगलच वळत ....

नातं मैत्रीचं असो की
कुटुंबाचं...
तिचा एकच अट्टाहास
एकदा जोडलं तर
शेवट पर्यंत टिकून
ठेवायचं..
हां ..
ती समजूतदार आहे इतकी
की कोणाचं ही चांगल वाईट वागणं समजू शकते...
ती भावनिक आहे इतकी
की आपल्या माणसाच्या चुकीसाठी ती रडू शकते ..
ती जिद्दी आहे इतकी
की डिलेव्हरी च्या दिवसांपर्यंत आणि डिलेव्हरी नंतर १५ दिवसांत लेक्चर घेऊ शकते इतकी !!!

काहीही असो
जशी आहे तशी माझी
जिवलग आहे ती !!!

Read More

जर समोरचा आपल्याला समजून घेत नाही , त्याच्या मध्ये थोडा ही समजूतदार पणा नाही अस आपण बोलत असू तर आपल्या समजूतदारपणा च काय उपयोग ???

Read More

आम्ही चौघी !!!

बोलता बोलता *पंधरा* वर्ष झाले ...
आमच्या या नाटकी मैत्रीला !!!
हा ! नाटकी या साठी 😅
कारण यामध्ये फक्त प्रेम ,
आपुलकी , जिव्हाळा नाही तर
यामध्ये राग , रुसवे , फुगवे ,
मत्सर, हेवा , तिरस्कार सुद्धा येऊन गेला !

जेव्हा भेटलो तेव्हा प्रेम , जिव्हाळा कमी तर
अभ्यासामध्ये स्पर्धा दिसली ...
पण या स्पर्धमध्ये स्पर्धक म्हणून
नाही तर सोबती म्हणून यशस्वी ठरलो !
प्रेम, काळजी तर वाढत चालली होती ...
पण कुठे तरी दुरावा ही आमची
मैत्री अनुभवू पाहत होता !
सुरुवात तर त्याने दोघी दोघींना
वेगळं करून केली !
पण त्या दुराव्यात नवीन
भविष्याची धडपड दाखवून दिली !
या धडपडी मध्ये शेवटी
दोन चे चार वेगळे रस्ते झाले ..
प्रत्येक रस्त्यावर चौघी एकट्या नव्हतो तर प्रत्येकीची जिद्द सोबत होती !
कधी कोणाला भरकटू दिलं नाही
या मैत्रीने !
जिथे चुकी दिसली तिथे
कान पकडून रस्ता दाखवला !
जिथे संकट दिसल तिथे
आत्मविश्वास बनून शेवट केला !

एखाद्या जोडप्या सारखं मत्सर होता आमच्यामध्ये !
चौघी पेक्षा एक नवीन म्हणजे
'कबाब मे हड्डी ' आमच्यामध्ये !!!

नेहमीच हसत , खेळत राहिलो अस नाही तर कधी रागात ,
भांडणं करून अगदी व्हॉट्स ग्रुप
लेफ्ट करून मैत्रीचा शेवट ही केला !
पण जेव्हा कधी एकट वाटल तेव्हा अश्रू पुसणारी हक्काची
मैत्रीचं पुन्हा पुढे दिसली !!!

हा ! ती इतकी स्वच्छ , निखळ
आहे की तिने कधी वाईट नाही
तर नेहमी चांगल च दाखवलं !
अगदी आयुष्याचे सगळ्यात
महत्वाचे निर्णय सुद्धा या
मैत्री ने एकमेकींना समजावत घेतले !
हा ! बऱ्याचदा दूर गेलो आम्ही
अगदी सगळ संपलं इतक्या दूर ...
पण नव्याने जवळ आलो नेहमी !

जेव्हा कोणी आमच्यासाठी नसत तेव्हा फक्त
हा एक च मैत्रीचा खजिना
आमच्या पुढे दिसतो !!!
इच्छा तर आहे ,
पण जिद्द पण आहे
शेवट पर्यंत अशीच सोबत राहूदे
ही नाटकी मैत्री !!!!

Read More

सखे ग !

सखे ग...!

जपून जा तुझ्या मार्गावर ...
कोणी नाही दिसले तरी
वाट नको सोडू तू ...
सोबत कोणी नसले तरी
वाट नको बदलू तू....

कोणी तरी असेल पुढे तुझ्या
कोणीतरी असेल मागे तुझ्या ...
कोणासाठी असशील तू एक
नवीन प्रवासी ..
तर कोणासाठी असशील तू
एक धाडसी प्रवासी ...

सखे ग....
असतील अनेक मार्ग तुझ्यासमोर
मन घाबरून, गोंधळून जाईल
गेलीस कुठे ही तरी एक
अनुभवाचा स्थानक बघून येशील !

सखे ग...
प्रत्येकच मार्ग नसेल
ओळखीचा, आवडीचा ...
वाट धरुनच असेल मार्ग
दुःखाचा आणि संकटाचा ...

सखे ग ..
कर ते खडतर मार्ग पार
आत्मविश्वासच्या गाडीने ....
नसेल कोणी चालक सोबती
तरी हारून जाऊ नको
शत्रूच्या भीतीने ....

सखे ग...
शेवटी तूच आहेस
तुझा मार्ग ,
तूच आहेस तुझी गाडी...
तूच आहेस तुझा चालक
तूच आहेस तुझे स्थानक....

Read More

बहोत दिनो से
आज की राह देख रही थी !
उसने फिर से याद दिला दी
मे फिर से गलत थी !

बहुत प्यार करती हू
लेकीन ना कभी
बोल पायी हु
और शायद ना
कभी बोल पाउगी !!!

मुझे सिर्फ उसका
वक्त चाहिए था ..
लेकीन वो जानने
के लिये भी उसे
वक्त नही था !

जब हमे आपकी जरुरत थी
तब आपको ये बचपना लग रहा था ...
आज आप को हमारी जरुरत है
तो सच मे हमी भी हमारा
बचपना याद आया !!!!

Read More

समजू शकलो नाही कधी आम्ही
तुला भीम म्हणून मिरवाव की
नवीन जन्म दिलास म्हणून भिमाई म्हणून पुजाव !
विचारात पडतो जो तो
बाप म्हणून सन्मान करावं की
देव म्हणून काळजात बसवाव !!!

तू महामानव, जीवनदाता बनून
आम्हाला मानव बनवलं !
साऱ्या जगाशी एकटा लढून
शेळी बनून जगणाऱ्या
लेकरांना वाघ बनवलं !

कळलास ज्यांना तू
त्यांनी तुला डोक्यात घेऊन
कृतीत उतरवल !
नाही कळणार कधी त्यांना तू
ज्यांनी तुला फक्त डोक्यावर घेऊन मिरवल !

जातीयता नष्ट तर केलीच
पण अज्ञानाच्या बेडीतून ही
सोडवलसं !
एकाच जन्मी आम्हाला
शंभर जन्मी सुख देऊन गेलास
जेव्हा बुद्धासारखा मार्गदाता
आमच्या कडे सोडून गेलास !

फेडू शकणार नाही कधी
तुमचे हे उपकार !!
हजारो जन्म मिळाले
तरी आम्ही तुमचेच आदर्श जपणार !!!

Read More