Marathi Religious videos by Brains Media Solutions Pvt. Ltd. Watch Free

Published On : 08-Sep-2022 03:49pm

220 views

गणपती विसर्जन ची सांगता

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

आपल्या सगळ्यांचा आन बाण शान असलेला गणेशोत्सवाचे लवकरच १० दिवस पूर्ण झाले आणि अंनत चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन उत्सवाची सांगता होते. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या चतुर्थीला गणपतीच्या मूर्तींची घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. हा सण मुख्य ११ दिवसांचा असतो. पण काही लोक आपापल्या परंपरा - पद्धतीनुसार दीड, तीन ,पाच किंवा सात दिवसाचा साजरा करतात. हा सण पूर्ण देशभरात मोट्या उत्सहात व धुमधडाक्यात साजरा करतात.

हे १० दिवस गणेशभक्तांसाठी अत्यंत खास असतात कारण दिवस - रात्र बाप्पाची पूजा, आरती, नैवेद्य आणि सजावट यामध्ये इतके तल्लीन असतात की बाप्पाला निरोप द्यायचा क्षण कधी जवळ आला हे समजतच नाही. आपल्या धर्मात अनंत चतुर्दशी दिवसाला फार महत्व आहे. या दिवशी गणेश विसर्जन शुभ मुहूर्तावर करतात आणि पुढच्या वर्षी बाप्पा आपल्या घरी परत लवकर या आणि आमच्या जीवनात सुख - शांती घेऊन पुन्हा या अशी इच्छा करून गणपती बाप्पाचे भक्त गण त्यांना निरोप देतात. गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते दैवत असल्याने विसर्जनावेळी अनेक गणेशभक्तांच्या डोळ्यातून पाणी येत . मात्र जड अंतकरणाने संकट मोचक गणरायाला, बाप्पा मोरयाच्या जयघोषात अंनत चतुर्थी या दिवशी प्रत्येक घराघरातून गणपती बाप्पाचा निरोप देऊन या उत्सवाची सांगता केली जाते.

त्याचप्रकारे प्रत्येक सार्वजनिक मंडपातून मंडळाचे सदस्य आपापल्या गणपतीची मूर्ती घेऊन ठरलेल्या मार्गाने हळू चालणाऱ्या वाहनातून, डॉल्बीचा फाटा देत त्याच प्रकारे अनेक गणेश मंडळांनी तर पारंपारिक ढोल ताशा, लेझीम, भजन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या गणरायाला निरोप देतात गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जल्लोष सुरू असतो. अनेक विसर्जन तलाव जवळ तसेच मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असते. त्या आकर्षक, सुंदर अशा गणेश मुर्त्या पाहून गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणेच फिटले जाते.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला जातो….

Article By

Anjali Patil

Brainsmedia Solutions

0 Comments