Aamchi Miss Aaji book and story is written by Nagesh S Shewalkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aamchi Miss Aaji is also popular in Children Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
आमची मिस... आजी - Novels
by Nagesh S Shewalkar
in
Marathi Children Stories
चंदामामा आणि आमरस! सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची आई स्वयंपाक।घरात स्वयंपाक करत होती. रामचे बाबा खाली बसून आंब्याचा रस करत होते. रामची आत्या कोकणात होती. तिने खास कोकणचा राजा म्हणून ख्याती असलेला रसाळ, मधाळ, चविष्ट असा आंबा खास रामसाठी पाठवला होता. राम आजीसोबत गप्पा मारत बाबा कसे रस करत आहेत याचे बारकाईने निरीक्षण करत होता. राम अत्यंत हुशार आणि चौकस मुलगा होता. प्रत्येक गोष्ट शांततेने समजावून घेण्याकडे त्याचा कल असे. त्यांच्या गॅलरीतून
चंदामामा आणि आमरस! सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची आई स्वयंपाक।घरात स्वयंपाक करत होती. रामचे बाबा खाली बसून आंब्याचा रस करत होते. रामची आत्या ...Read Moreहोती. तिने खास कोकणचा राजा म्हणून ख्याती असलेला रसाळ, मधाळ, चविष्ट असा आंबा खास रामसाठी पाठवला होता. राम आजीसोबत गप्पा मारत बाबा कसे रस करत आहेत याचे बारकाईने निरीक्षण करत होता. राम अत्यंत हुशार आणि चौकस मुलगा होता. प्रत्येक गोष्ट शांततेने समजावून घेण्याकडे त्याचा कल असे. त्यांच्या गॅलरीतून
श्यामची पत्रावळ ! दुपारचे तीन वाजत होते. श्याम नुकताच शाळेतून परतला होता. आल्याबरोबर त्याने शाळेचे दप्तर टेबलवर ठेवले. आईकडे हसून बघत त्याने दप्तर उघडून एक पुस्तक काढले. ते ...Read Moreआईच्या हातात देत श्याम म्हणाला, "आई, हे बघ मला हे पुस्तक बक्षीस मिळाले आहे." श्यामच्या हातातले पुस्तक घेऊन श्यामकडे कौतुकाने बघत आई म्हणाली, "अरे, व्वा! बक्षीस मिळाले. तेही सानेगुरुजींचे पुस्तक. अभिनंदन! पण बक्षीस कशासाठी मिळाले ते नाही सांगितले?" "आई,आज आमच्या शाळेत सानेगुरुजी वाचनमाला या संस्थेची माणसं आली होती.
**** श्रावणबाळ !**** रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात दहावीपर्यंत शाळा होती. दोन-तीन दवाखाने होते. एक बँकही होती. रामपूर या गावात लक्ष्मण नावाचा एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. रोजमजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ ...Read Moreहोता. त्याच्या पत्नीचे नाव ऊर्मिला असे होते. त्यांना विजय नावाचा एक मुलगा होता. नाव विजय असले तरी सारेजण त्याला 'श्रावणबाळ' याच नावाने बोलावत असत.त्याला कारणही तसेच होते. विजयला घरातील कामे करायला आवडत असे. लहानपणापासून तो कोणते ना कोणते काम करीत असे.किराणा दुकानातून साखरपत्ती, तेल, दूध अशा छोट्या छोट्या वस्तू तो
■■ कविता कालची..शिकवण आजची! ■■ ...Read More * गोरी गोरी पान... * माधवी शाळेतून घरी आली. नेहमीप्रमाणे तिची आई दीपिका दारात उभी नसल्याचे पाहून माधवीला आश्चर्य वाटले. दार उघडे होते. आई काय करते हे पाहावे म्हणून माधवी आवाज न करता घरात आली. तेव्हा तिने बघितले की, तिची आई डोळे लावून शांतपणे बसली होती. दूरदर्शनवर असलेल्या आकाशवाणी केंद्रावर लागलेले गाणे ऐकण्यात तल्लीन झाली होती. ती गाणे ऐकण्यात एवढी रंगून गेली होती की, माधवी येऊन तिच्या शेजारी बसल्याचेही तिच्या लक्षात आले नाही. गाणे ऐकताना तिचे डोळे बंद झाले होते. ओठ ऐकू
= नातू माझा भला! = दुपारचे दोन वाजत होते. मे महिन्यातले ऊन प्रचंड आग ओकत होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. 'सूर्यकिरण' या वसाहतीत असलेल्या एका सदनिकेत ओंकार मस्तपैकी खेळत होता. ओंकारचे खेळणे म्हणजे नुसता धिंगाणाच ...Read Moreनुकतीच त्याची पाचव्या वर्गाची परीक्षा संपली होती. पोहणे, क्रिकेट, हस्ताक्षर सुधार अशा विविध कार्यक्रमांना आठ-दहा दिवस सुट्टी असल्यामुळे ओंकारजवळ भरपूर वेळ होता. त्यामुळे त्याचा मनसोक्त धिंगाणा सुरु असे. दिवाणखान्यात खेळणाऱ्या ओंकारला अचानक काही तरी आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भावनांनी गर्दी केली. मांजराच्या पावलाने तो आजीच्या खोलीजवळ पोहोचला.