Chandra aani Nilya betaverchi safar - 15 books and stories free download online pdf in Marathi

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 15

भाग -१५
रेवतीनगरात - स्वागत

घामाघूम झालेले मद्रवासी गलबातवर पोहचले.दंतवर्मानी सरजूला काही कोळ्यांना माघारी पाठवायला सांगितले.चंदेलमध्ये चंद्राची आई, बहीण गौरी वाट बघत होते.चंदेलवासीय कोळी चार होड्यांतून चंदेलला रवाना झाले. सरजू, चंद्रा,वाघ्या व आणखी चार कोळी एवढेच रेवातीनगरला जाण्यासाठी थांबले.आता प्रवास थोडफारच शिल्लक होता.सुरवातीला काळोखातून व नंतर चंद्राच्या शीतल चांदण्यात प्रवास सुरू झाला.चंद्रा, सरजू व दंतवर्मां गलबताच्यां फळ्यांवर पहुडले होते.आकाशात त्रयोदशीचा चंद्र चांदण्याची बरसात करत होता.या चांदण्यात काही तारका लक्ष वेधून घेत होत्या. मध्येच पाण्यात सूर मारणारे माशे चांदण्यामुळे चमकत होते.मधे मधे निशाचर पक्ष्यांच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता. समुद्री पक्षांचे पंख लांब व मजबूत असतात.कारण त्यांना शिकार पायात किंवा चोचीत पकडून दूर अंतरापर्यंत जायचे असते.त्यात समुद्री ब्राम्हणी घार,समुद्री गरुड, ससाणे असे प्राणी असतात.
"ते बघा, तेथे पाण्यात इंदर्धनुष्यासारखे रंग दिसताहेत"
सुकाणूजवळ बसलेला कोळी ओरडला.चंद्रा चटकन उठला व गलबताचा कडेला आला.उजव्या बाजूला दूरवर पाणी अक्षरशः लाल, नारिंगी, हिरव्या व जांभळ्या रंगाने चमकत होते.पाण्यावर इंद्रधनुष्य तरंगत असल्याचा भास होत होता.सारे डोळे विस्फारून बघत राहिले.
"ते विशिष्ट प्रवाळ आहेत..जे चंद्रप्रकाशात चमकतात. साधारण लाल, नारिंगी व जांभळा रंग ते बाहेर सोडतात. सरजू म्हणाला.
"पण किती छान दिसत हे दृश्य"चंद्रा म्हणाला.
" होय, दिसतात छान.पण यातले काही प्रवाळ पाण्यात अधिक खोलीवर आदळतात.पण तरीही चांदण्या रात्री त्यामुळे पाणी रंगीत असल्याप्रमाणे चमकत." सरजू म्हणाला.
चंद्राला त्याच्या बापाने म्हणजेच सरजूने दर्यासंबंधात त्याला यापूर्वीही कितीतरी उपयुक्त माहिती सांगितली होती.त्यामुळेच चंद्रा निळ्या बेटावरची धाडसी सफर यशस्वी करू शकला होता.
चंद्रा व सरजू पुन्हा झोपण्यासाठी आपल्या जागेवर आले. सळसळत्या पाण्याचा आवाज व गार वार यामुळे ते केव्हाच झोपी गेले.काही नावाडी मात्र आलटून पालटून जागत रात्र भर गलबत हाकात होते.मधे मधे ते कोळी गीते म्हणायचे. त्यांचा खडा आवाज दर्याच्या लाटांबारोबर आसमंतात घुमत होता.बघता बघता रेवतीनगर जवळ येत चालले होते.भल्या पहाटे सरजू व चंद्रा उठले.रात्री जागलेल्या नावड्याना त्यांनी विश्रांती दिली. दंतवर्मां उठले होते..सकाळची ध्यानधारणा संपवून ते सरजू पाशी आले. सभोवार बघत ते म्हणाले,
"मला वाटतं आपण दुपारपर्यंत रेवती नगरला पोहचू"
"होय, प्रधानजी." सरजूने उत्तर दिले.
एवढ्यात पांढरेशुभ्र कबुतर उडत येऊन दंतवर्मांच्या खांद्यावर बसले. दंतवर्मांनी त्याला हलकेच गोंजारले.कबुतराच्या उजव्या पायाला संदेश बांधलेला दिसत होता.दंतवर्मानी संदेश लिहिलेला
रेशमी रुमाल हलकेच सोडविला.तो संदेश राजा भद्रसेन यांनी दंतवर्मांना पाठविला होता.त्यात लिहिले होते....
"प्रधानजी, काम पूर्ण झाले का? पौर्णिमा दोन दिवसांवर आली आहे. सारे रेवतीनगर तुमची वाट बघतेय"...राजा भद्रसेन.
दंतवर्मांनी त्वरित त्याच रुमालावर खाली लिहिले,
" रेवती देवीच्या कृपेने सारी कामे पूर्ण झालीत.उत्सवाची तयारी करा.आम्ही आज सायंकाळ पर्यंत रेवातिनगरला पोहचू."...प्रधान
दंतवर्मांनी तो संदेश कबुतराच्या पायाला रेशमी धाग्यांनी बांधला.त्याच्या पाठीवरून हात फिरवला व त्याला हलकेच हवेत उडविले.बघता बघता ते कबुतर आकाशात उडाले.
"प्रधानजी , किती वेळात हे कबुतर रेवतीनगराला पोहचेल?" चंद्राने विचारले.
"सूर्य माथ्यावर येईपर्यंत! ही कबुतर प्रशिक्षित आहेत. शिकारी पक्षी व शत्रूंपासून बचाव करीत योग्य ठिकाणी कसे पोहचावे याचे प्रशिक्षण त्यांना दिले आहे.कोणत्याही परिस्थितीत शत्रूच्या हाती संदेश पडणार नाही याची ति दक्षता घेतात."
चंद्राला कबुतरांच्या या वैशिष्ट्याचे कौतुक वाटले. गलबत आता अधिक वेगाने प्रवास करू लागले.साऱ्यांनाच कधी एकदा रेवातीनगराला पोहचतो असे झाले होते.वाराही छान सुटला होता. सायंकाळी उन्ह कलल्यावर दुरून रेवतीनगरचे प्रवेशद्वार दिसू लागले.सारेजण अत्यानंदाने ओरडले.ते जसजसे किनाऱ्यावर पोहचले तसतसे वाद्यांचे आवाज त्यांच्या कानी पडू लागले. प्रवेशद्वार रंगबिरंगी पतकांनी सजवलेले दिसले. असंख्य नागरिक तिथे गोळा झाले होते.स्वतः राजे भद्रसेन ,दंतवर्मां व देवी रेवतीच्या दिव्य मुकूटाच्या स्वागतासाठी आले होते. चंद्रा व दंतवर्मां किनाऱ्यावर उतरताच गुलाल उधळून साऱ्यांनी त्यांचे स्वागत केले, तर वाघ्या ढोल ताश्यांच्या गजरात नाचू लागला.
------ -------*----------------*-------------*---------
भाग - १६
समारोह - ( अंतिम भाग) उत्कंठावर्धक व वेगळा