GIFT FROM STARS 50 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - ५०

        'जवळपास तासाभराने भूमीला जाग आली, क्षितीजने गाडी थांबवली होती. आणि तो तिच्याकडे बघत होता. कदाचित तो तिच्या उठण्याची वाट बघत असावा. तिने समोर पहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती चक्क आश्रमाच्या समोर होती. तिचा आश्रम लहानपणीच्या आठवणींचा आश्रम. कितीतरी महिने ती इकडे फिरकली सुद्धा नव्हती. आज क्षितिजमुळे ती पुन्हा तिथे आली होती. त्या लहान सवंगड्याना भेटायला.'

 

''क्षितीज विश्वास बसत नाही रे, थँक्स, थँक्यू सो मच.'' म्हणत उतरून ती आश्रमाच्या फाटकातून आत निघाली. क्षितीज गाडी पार्क करून तिच्या मागे आश्रमात जाऊ लागला. तेथील मुलांनी तिला बघून एकच गलका केला होता. ''भूमी दीदी आली.'' म्हणत सगळे तिच्या दिशेने आले. धावत येऊन सगळी मूळ तिला भेटली. आश्रमातील बाई, मदतनीस मंडळी त्या दोघांना भेटायला पुढे आले. क्षितीज आणि भूमी आश्रमात पोहोचले. आत हॉलमध्ये बसून त्यांच्या गप्पा रंगल्या. आपण इथे नसतानाही क्षितीज इथे येऊन जायचा. या मुलांना खाऊ आणि भेटवस्तू द्यायचा. तसेच SK गुओप कडून इथे दरवर्षी न चुकता डोनेशन हि येते. हे ऐकल्यावर भूमी फार बरं वाटलं. क्षितीजचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी होते. ती खूपच खुश झाली.  क्षितीज आणि भूमी दोघेही त्या मुलांमध्ये दंग होते. मस्ती आणि मज्जा सुरु होती. खानपान सगळं तिथेच झालं.  

''बाय द वे, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होत. वेळ आहेच आणि इथे कोणी डिस्टर्ब करणार नाही.'' क्षितिज भूमीला म्हणाला. आणि भूमीने आजूबाजूला नजर टाकली. आश्रमाच्या अंगणात असलेल्या बाकड्यावर दोघे बसलेले होते, मुलं खेळून दंवलेली होते, त्यामुळे ती आतमध्ये गेली होती. आजूबाजूला कोणीही नसल्याचे भूमीला जाणवले. तेव्हा तिने क्षितिजला तिची आपबिती सांगायला सुरुवात केली. आणि ऐकत असताना क्षितिजला आश्यर्य वाटत होते, त्याला माहित नसणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्याला तिच्याकडून माहित झाल्या.

 

'पहिली गोष्ट म्हणजे, ती मायग्रेन ट्रीटमेंट साठी परदेशी गेली नव्हती तर तिला ब्रेन ट्युमर होता, त्याच्या केमोथेरपीसाठी ती तिथे गेली होती. तिचे त्यातून वाचण्याचे चान्सेस फक्त १० टक्के होते, कारण तिने कॅन्सर ची दुसरी स्टेज क्रॉस केली होती. त्यामुळे तिला असे वाटले कि आपण काहीच दिवसाचे सोबती आहोत. क्षितीज च्या संपर्कात राहून आपण गेल्यानंतर त्याला त्याचा खूप त्रास होईल त्यापेक्षा आपण त्याच्याशी सर्व प्रकारचा संपर्क तोडावा, म्हणजे त्याच्या मनात आपल्या बद्दल राग उत्पन्न होईल. आणि तो आपल्याला विसरून जाईल. कमीत कमी आपण मेल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा एवढा त्रास होणार नाही. असा विचार करून तिने परदेशी जाताच आपला मोबाइल नंबर बदलला आणि इतर कोणत्याही प्रकारे क्षितीज शी संपर्क केला नाही.' 

 

'दुसरी गोष्ट म्हणजे, मैथिली देखील भूमी बरोबर तिच्या ट्रीटमेंट साठी परदेशी गेली होती. मैथिली २४ तास भूमीच्या सोबत होती. स्मृती गेली असली तरीही तिला आजूबाजूला काय घडत आहे, हे समजत होत. महत्वाचं म्हणजे एकदा भूमीच्या मोबाइल मध्ये क्षितीज चा फोटो पाहून तिने त्याला ओळखलं होत, तिची तब्येत त्यानंतर खूपच बिघडली. आणि डॉक्टर ने तिला त्रास होणाऱ्या कोणत्याही गोष्टी, फोटो, आवाज किंवा इतर कोणीही व्यक्ती याना तिच्यासमोर आणण्यासाठी सक्त मनाई केली. त्यामुळे भूमीने क्षितीज ला आपल्या पासून लांब ठेवण्याचा निर्णय अगदी पक्का केला.'

‘परदेशी ट्रीटमेंट झाल्यावर भूमीच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि ती भारतात परतली. इथे आल्यावर तिला क्षितीज आणि S K ग्रुप यामध्ये झालेल्या बदल विषयी समजले. क्षितीज तीच तोंडही पाहायला तयार नाही हे समजल्यावर तिला काय करावे सुचेना, मग तिने तिच्या बाबानी तिच्या समोर ठेवलेला कंपनीचा प्रस्ताव स्वीकारला. आणि मिस्टर किर्लोस्करांच्या जागी कंपनीच्या पार्टनर पदी ती नियुक्त झाली. फक्त क्षितिजच्या जवळ राहता यावं आणि त्याला समजवावं या एकमेव हेतूने तिने हि जबाबदारी स्वीकारली होती.’

निधीला भूमीच्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. पण भूमीने तिच्याकडून वचन घेतले होते, कि तिने हे कोणालाही सांगू नये. त्यामुळे निधी क्षितिजला याबद्दल काहीही कल्पना देऊ शकली नाही.

सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यावर भूमीला हलकं झाल्यासारखं वाटलं. तिने सुटकेचा एक निश्वास सोडला. क्षितीज अजूनही शून्यात नजर लावून बसलेला होता. अजाणतेपणी तो भूमीला बरेच काही बोलून गेला होता. आता शब्द माघार घेणे शक्य नव्हते. ''सॉरी.'' एवढेच बोलून त्याने आपले डोळे पुसले.

''दॅट्स फाईन, तुला याची काहीच कल्पना नव्हती. तू तुझ्या जागी माझ्यासाठी बेस्टच आहेस.'' भूमी बोलत होती.

''तू आता ठीक आहेस ना? कि अजून काही ट्रीटमेंट ची गरज आहे?'' क्षितीज काळजीच्या स्वरात म्हणाला.

''मी ठीक आहे, पण एकदा ट्रीटमेंट साठी जावं लागेल. थोडा त्रास अजूनही होतो. पण धोका पूर्णपणे टळलेला आहे.''

''गुड, पूर्णपणे बरी हो.  पुन्हा जावं लागलं तरीही चालेल.''

''थँक्स क्षितीज, तुझं माझ्यावरच निस्वार्थ प्रेम, नाना आणि माईंचा आशीर्वाद आणि मिस्टर किर्लोस्करांनी ट्रीटमेंट च्या खर्चासाठी केलेली मदत यामुळे मी आज इथे दिसते. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.''

''म्हणून तू कोर्लोस्करांचं ऐकतेस का? 'आणि त्यांच्या घरी राहतेस?'' क्षितीज

''होय, त्यांनी यावेळी खरंच खूप मदत केली. लहानपणी आई मला सोडून गेली, बाबांचा पत्ता नव्हता, माझ्यासाठी ते हयाद नव्हते, नंतर मोठी झाल्यावर विभास कडून झालेली फसवणूक यामुळे मी मेंटॅलि खूप स्ट्रेस होते. त्यातून हा आजार झाला. असं डॉक्टर म्हणाले. पण हे समजताच पप्पांनी मला खूप मदत केली. मानसिक आधारही दिला. '' भूमी

''दॅट्स गुड. आता तू माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नकोस. मी नेहेमीच तुझ्यासोबत असेन. बेशर्त.'' क्षितीज तिचा हात हातात घेत म्हणाला. आणि ती होकारार्थी मन डोलावून हसली.