Julale premache naate - 3 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३

सकाळच्या अलार्म ने माझी झोपमोड झाली. घडाळ्यात सात वाजता होते. मी आज स्वतःच उठले, आज पहिला दिवस होता ना माझा आणि निशांत चा. म्हणजे डान्ससाठीचा... डान्स बसवायचा होता त्यामुळे लवकर तय्यारी करून मला निघायचं होत. मी फ्रेश होत बाहेर आले. किचनमध्ये आई डब्बा तय्यार करत होती.


"आई.., मला लवकर चहा आणि नाश्ता दे मला उशिर होतोय." काय मॅडम.! आज लवकर उठलीस, ते ही मी न उठवता...!! .... सूर्य कोणत्या बाजुला उगवला आहे...... आईने डोळा मारतच मला विचारलं.... आई..! काय ग...चल दे लवकर नाश्ता उशीर होतोय.... माझ्या हातात चहा आणि नाश्ता देत आई उच्चारली. "बाळा निशांत चांगला मुलगा आहे हा. आवडला मला, छान माझी आणि त्याची मैत्री ही झाली. त्याच्यासाठी हा थालीपीठा चा डब्बा त्याला दे हा." मी नाश्ता संपवत, माझा आणि त्याच्यासाठी चा डब्बा घेत निघाले. प्रवास करून कॉलेजच्या ऑडीमध्ये पोहोचले. आज मी दहा मिनिटे लवकर होते आणि निशांत लेट.

"हेय, गुड मॉर्निंग." निशांत ऑडीमध्ये धापा टाकायचं आला आणि मला त्याने विश केलं. "गुड मॉर्निंग निशांत.., आज तु दहा मिनिटे लेट आहेस. हे अस लेट येण मला बिलकुल चालणार नाहीये. आणि लेटच यायच होत तर मॅसेज टाकायचा होतास. नंबर नाही का माझा तुझ्याकडे..??". मी कमरेवर हात ठेवुन, निशांतची ऍकटिंग करून दाखवत होते. हे बघून तो हसत सुटला, नंतर पोट धरून चेअरवर बसला. स्वतःचे कां धरत त्याने माझी माफी ही मागितली.... "मॅडम सॉरी हा. नेक्स्ट टाईम नक्कीच मॅसेज करेन." मग आम्ही दोघे ही हसलो.

मी निशांत जवळ गेले... निशांत काही खाल्ल्यास का..?. हे घे आई ने तुझ्यासाठी थालीपीठ पाठवली आहेत. मी डब्बा पुढे करत म्हटलं. माझ्या हातातला डब्बा घेत त्याने ती थालिपीठं अक्षरशः तोंडात कोंबली. "अरे हो हो..! तुझ्याचसाठी आहेत. मी खाऊन आलीये. मी नाही घेणार तुझी थालीपीठं, आरामात खा..."
त्याच खाऊन होताच आम्ही डान्स ची प्रॅक्टिस करायला स्टेजवर आलो. ते गाणं आधी आम्ही नीट ऐकल.
निशांत मला कुठुन एन्ट्री घ्यायची आणि एक्सिट हे आधी समजावत होता.


"प्रांजल आपण ना गाणं सुरू झाल्यावर म्हणजे, तु डाव्या बाजूच्या विंगेतून एन्ट्री घे. मी आधीच जाऊन उभा राहीन. त्यानंतर त्या कडव्यानुसार जाऊया. तर पहिल्या कडव्यातली ओळ आहे...."तू आता है सीने में", यासाठी तु डाव्याबाजूच्या विंगेने स्टेजवर यायच आणि मी समोर उभा असेल. मला भेटायचं प्रेमाने. मग दुसऱ्या ओळीला आपण एक दोन स्टेप करूया. थांब मी तुला दाखवतो, निशांत उभा राहत त्याने मला एक स्टेप दाखवली. ही बघ ही जमेल ना तुला....?!"


मी ट्राय करते. मी उठुन त्याच्या समोर आली. त्याने माझा हात घेतला आणि दूर जाऊन गोल फिरून मी परत त्याच्या जवळ आले. छान...!! जमतंय तुला.
नंतर काय आहे, तर...."जब-जब सांसें भरती हूँ"...यासाठी पहिली स्टेप झाली की, तू माझ्या समोर येऊन उभं रहायचं.. मी तुला उचलून फिरवेन ओके. "तेरे दिल की गलियों से", यासाठी तु माझ्या चेहर्याभोवती आपला हात फिरवायचास आणि पुढे काय आहे... "मैं हर रोज़ गुज़रती हूँ,"...हा या ओळीला तु माझ्या जवळून लांब जायचं. ठीक आहे ना.., तुला कळलं प्रांजल. चल दाखवतो.


पहिल्या स्टेप ला त्याचा मला स्पर्श झाला. मी तर लाजूनच खाली पडले. "अग लागला नाही ना तुला...?" ठीक आहेस ना.??.
हो ठीक आहे. अस पहिल्यांदाच कोणत्यातरी मुलाचा स्पर्श झाला म्हणुन अस झालं. सॉरी.
निशांत माझ्या समोर येऊन बसला. आणि मला सजावु लागला..."हे बघ प्रांजल, कस असत ना..! हा डान्स आहे. यामध्ये स्पर्श तर होणारच ना... आणि आता तर आपण फ्रिएन्ड्स ही आहोत ना..!. सो अस ऑकवर्ड नको फिल करून घेऊस...समजलं. मी मान हलवूनच होकार दिला.


"बाय द वे तु मेडिसिन घेतल्यास का.??" मॅडम बर नव्हतं तुम्हाला. मी जीभ चावतच नकार दिला. त्यानेच मग मला पाणी आणि माझ्या बॅगेमधल्या मेडिसिन काढुन दिल्या. वाह!!!... आज माझी एवढी काळजी....? मी डोळा मारताच त्याला विचारले. "तुझी काळजी तर घ्यावी लागणार ना.. नाही तर मला डान्स पार्टनर नवीन शोधावा लागेल." आणि हसु लागला. मी माझं तोंड लगेच वाकड करून दाखवलं. परत प्रॅक्टिस करून आम्ही जरा वेळ बसलो.


मी घडाळ्यात पाहिले तर बारा वाजायला आलेले. अरे वाजले बघ किती..?! लेक्चर साठी उशीर होईल. मी निघते उद्या याच टाईम ला, अस सांगून मी तर पळालेच. निशांतचा आवाज मागुन येत होता... अग सांभाळून जा, पडशील.....
मी पळत क्लासरूम मध्ये पाहोचले, तर हर्षु बेंचवर बसली होती. मी पण जाऊन बसले तिच्या बाजूला.


"काय मॅडम, कशी आहे तब्बेत....?" मी एकदम मस्त आहे. तुला एक सांगायचं होत, पण त्याआधी मला सांग त्या निशांतला माझ्या घरचा पत्ता का दिलास..??? मी रागातच बघितल तिला. "अरे मी नव्हते देत... पण त्याने मला खूपच रिक्वेस्ट केली ना म्हणून दिला. डिअर तुला म्हाहित आहे ना मला किती आवडतो तो निशांत...".... त्याच्या कोणत्याच गोष्टीला मी नकार नाही देऊ शकत. ते मला जमलंच नसत.


ते त्या दिवशी त्याने मला क्लासरूमधुन निघाल्यावर पार्किंगमध्ये अडवलं. ती जरा लाजतच मला हे सगळं सांगत होती. मी हाताची घडी घालून सगळं ऐकत होते. ती पुढे बोलु लागली. "तर काय झालं.. मी स्कुटीवरून जात होते तर, त्याने मला मधेच अडवलं आणि मला बोलायचं आहे..., असा बोलला.

एक क्षण तर मला वाटलं प्रपोज करतो आहे की काय... पण कसलं काय... त्याने फक्त तुझ्या घरचा पत्ता मागितला आणि मला खुप रिक्वेस्ट केली यार प्राजु त्याने.. सो मी नाही बोलु शकली नाही आणि दिला... सॉरी प्राजु... मी मोठा श्वास घेत तिला "ओके केलं माफ", एवढंच म्हटलं. आता मी सांगते काल काय झालं ते, आणि काल जे काही घडलं ते मी तसेच्या तसे सांगितले. ती सगळं ऐकून फक्त...किती लकी आहेस यार तु... एवढंच म्हटली.

बाय द वे आम्ही परत पार्टनर म्हणून डान्स करतोय, आताच मी तिकडून आलीये. "काय..! प्राजु यार सॉलिड आहेस तु....
मी काही नाही ग... त्यानेच एवढं मनवल, सो मी नाही बोलु शकली नाही. त्यात आम्ही आता चांगले फ्रिएन्ड्स ही झालोय. हे ऐकताच ती जरा रागातच बोलली. "फ्रिएन्ड्स रहा हा तुम्ही... कपल होऊ नका. कारण या वेलेन्टाइनला मी त्याला प्रपोज करणार आहे ग प्राजु." मी फक्त हो म्हटलं. पण बोलतात ना प्रेम काही सांगून किव्हा ठरवुन होत नाहीत.


मी मधेच थांबत सर्वांकडे पाहिलं.., बर ऐका..!! आता आपण जरा फ्रेश होऊया का...? मी मधेच स्टोरी थांबवत विचारल. तिघांनी माझ्याकडे पाहिलं. सगळ्यांनी मग ब्रेक घ्यायचा ठरवला. मी पळत बाथरूममध्ये घुसले. आता समजून घ्या तुम्ही हे पण सांगु का...


फ्रेश होऊन सोफ्यावर बसले. बाकीच्या ही फ्रेश व्हायला गेल्या... अभि चहा करायला किचनमध्ये गेली. मी माझ्या मोबाईल वर इंटरनेट चालू केला. तर याचे तीन-चार मॅसेज होते.

"हो...,
घरी जाऊन खाऊन घेईल. तु देखील लवकर ये. जास्त वेळ लागत असेल तर मला फोन कर मी येतो तुला घ्यायला.
मिस यु हनी-बी. बाय.. काळजी घे."

मी मॅसेज बघून फक्त एक स्माईल पाठवली. वृंदा माझ्या समोर बसली. अभि चहा घेऊन आली आणि सोबत प्रियांका समोसा- वड्यांची प्लेट. चहा सोबत मला बटाटा वडा खूप आवडतो. म्हणून माझ्यासाठी बटाटा वडा, तर त्या तिघींसाठी समोसे होते. मी गरम चहा आणि वडा खात मग्न होते की, प्रियांकाने मधेच थांबवल. " ए प्राजु लवकर खा आणि स्टोरी चालू कर... तुझी स्टोरी तर एखाद्या मुव्ही सारखीच आहे." मी हातातला वडा आणि चहा गटागट पिऊन स्टोरी चालु केली.


आता आमचं रोजच रुटीन झालेलं. आधी डान्स प्रॅक्टिस आणि नंतर लेक्चर्स. नुसती धावपळ चालु होती. अशाच एके दिवशी मी एकटिच प्रॅक्टिस करत होती, निशांत आला नव्हता. मी प्रॅक्टिस करत असतानाच डान्सच्या फ्लोमध्ये मी स्टेजवरून खाली पडणारच होते की, निशांत ने मला झेलले. तो कधी आला हे कळलं नाही, पण आला आणि मला वाचवलं म्हणून नि देवाचे आभार मात्र लगेच मानले.

मी त्याच्या कवेत होती. एक क्षण कळलंच नाही, पण आज तो आला नसता तर माझा पाय मोडलाच असता. खाली ठेवत तो माझ्यावर चांगलाच ओरडला.. "प्रांजल, वेडी आहेस का...? लक्ष कुठे होत तुझं... आज जर तुला काही झालं असत तर माझं कस झालं असत..." मला एक क्षण कळलंच नाही की, निशांत असा का बोलला. त्याने लगेच आपले वाक्य बदलले. "म्हणजे मला नवीन पार्टनर शोधावा लागला असता आणि परत सगळं बसवाव लागलं असत. मूर्ख मुलगी.." यावर मी फक्त एक स्माईल दिली. त्यानेही एक स्माईल दिली आणि बॅकस्टेजला निघून गेला.


मी त्याला बघतच राहिले. त्याने सॉंग चालु केले आणि मला स्टेजवर बोलावले. आम्ही आमच्या डान्सला सुरवात केली. मी गाणं सुरू होताच डाव्याबाजूच्या विंगेतून ठरल्याप्रमाणे आले आणि आम्ही आमचा डान्स करू लागलो. त्याचं माझ्या जवळ येणं... परत स्टेप्स सोबत दूर जाऊन जवळ घेणं. सगळं मला छान वाटत होतं. एखाद्या पिक्चरमधल्या रोमॅंटिक सॉंग सारखं. छान चालु होता आमचा डान्स. ते गाणं आणि तो माहोल सगळं वेड लावणार होत.


मधेच मला निशांत नवीन एक स्टेप शिकवत होता. "प्रांजल.., पुढचा डान्स बसवू या... हे बघ आता ना तु पळत यायच आणि मी तुला उचलून घेईन अन गोल फिरवेन ओके.. चल दाखवतो.. यासाठी आपल्याला खुप मेहनत आहे. ही स्टेप करूया.. तु समोरून पळत ये." मी होकार देत लांब गेले आणि पळत आले. निशांत ने मला उचलून घेतलं आणि गोल फिरवत राहिला. दोन राउंड झाल्यावर त्याने खाली सोडलं. पण गोल फिरवल्याने मला चक्कर आल्यासारखं झालं आणि मी खाली पडणारच होते की, निशांतने मला कमरेत हात घालुन पकडलं. आता मी त्याच्या अगदी जवळ होते. आम्ही एक-मेकांच्या नजरेत काही काळ हरवलो होतोच की, दारातून हर्षु आत आली.

"हेय... प्रांजल.." आणि तिने मला निशांतच्या मिठीत बघितल आणि ती तिथुनच निघून गेली. हे बघून निशांत ने फक्त...."हिला काय झालं. आली काय आणि निघून काय गेली." एवढंच म्हटलं. मी स्वतःला त्याच्या मिठीतुन वेगळं केलं. आणि स्टेजखाली येऊन स्वतःची बॅग घेत मी देखील ऑडीमधून निघुन गेले. हे सगळं निशांत स्टेजवरून बघत उभा राहिला.


मी धावत जाऊन हर्षु ला अडवले. "हर्षु..., अग काय झालं तुला...? माझ्याशी बोलायला आलेलीस ना..? अशी अचानक का निघुन गेलीस..???. मी तिचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि तिला थांबवलं. "हर्षु मला काही सांगशील का तु...???" प्राजु तु.... का करतेस अशी....?. मी काय केलं हर्षु...??? तुम्ही नक्कीच डान्स करत होतात ना...??! आज मी तुला निशांतच्या मिठीत पाहिलं.. प्राजु यार मला नाही सहन होत तु त्याच्या एवढं जवळ गेलेली. तुम्ही फक्त फ्रिएन्ड्स आहात ना...?. "हर्षु तु वेडी झाली आहेस का..तो फक्त डान्सचा पार्ट आहे. तु चुकीचं समजते आहेस." मी तिला समजावलं तेव्हा कुठे ती शांत झाली. मग मलाच मिठी मारून सॉरी देखील बोलली. "यु नो ना प्राजु.. मला निशांत किती आवडतो आणि त्याच्या एवढ्या जवळ मी कोणालाच नाही बघू शकत. कोणालाच नाही...या वाक्यावर तिने जरा जास्तच जोर दिला... मला तर अस झालाय कधी मी त्याला माझ्या मनातल सांगतेय."मी फक्त मान हलवत होते.

मग आम्ही दोघे ही क्लासरूममध्ये पोहोचलो. लेक्चर्समध्ये सारखे मला हर्षु चे शब्द आठवत होते. माझं मन कशातच लागत नव्हत. कसे तरी लेक्चर्स संपवून आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो. कॅन्टीनमध्ये आम्हाला जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. कसला आवाज म्हणून आम्ही पूढे बघायला गेलो, तर एक मुलगा आमच्या वर्गातल्या एका मुलीचा हात धरून तिच्यावर ओरडत होता आणि सगळे फक्त बघण्याची भूमिका करत होते. मग मीच पुढे जाऊन त्या मुलाच्या एक कानाखाली लावून दिली.


"काय स्वतःला समाजतोस.., आम्ही ज्युनिअर असलो म्हणून काय झालं ही पद्धत नाहीये कोणत्याही मुलीशी बोलायची. नेक्स्ट टाईम कोणत्याही मुलीला अस ट्रीट केलंस तर स्वतःच्या गालाला हात लावायचा आणि ही कानाखाली आठवायची...कळलं." तो मुलगा फक्त मला बघत राहिला. हर्षु ही मग पुढे आली मला बघुन... आणि त्या मुलाला बघून तिने त्याला मिठी मारली. मी फक्त बघत होते की चालू काय आहे.


"अग प्राजु हा माझ्या काकांचा मुलगा आहे.. मी एकदा सांगितलं होतं बघ तुला. आजच जॉईन झाला आहे. "काय भाई..? हे काय आलास आणि हे काय चालु आहे भाई..??" अरे काय करू.. त्यामुलीनेच सुरुवात केली....मग मी देखील सुरू झालो. विचार हवं तर त्या मुलीला. आणि ते एकमेकांना टाळ्या देत हसु लागले. हर्षुने माझी ओळख करून दिली. पण मला त्या मुलाला भेटण्यात काडीचा ही इंटरेस्ट नव्हता. त्याने आपला हात पुढे केला पण मी तिथून निघु गेले. हर्षु मला आवाज देत राहिली, पण मी काही मागे पाहिलं ही नाही आणि तशीच घरी जायला निघाले.


"काय ग हर्षु ही कोण आहे.??" सॉलिड आहे.. कसली कानाखाली मारली यार हिने अजून कान आणि गाल दोन्ही दुखत आहेत. "भाई सॉरी हा.. ही माझी बेस्ट फ्रिएन्ड आहे. तु प्लीज मनाला नको लावून घेऊस. मी माफी मागते. आणि हो हे अस चालणार नाही हा इथे. प्रिन्सिपल काढून टाकतात डायरेक्ट समजलं... आणि तिला काही बोलु नकोस हा भाई..


" डोन्ट वरी हर्षु तिला काहीच करणार नाही मी... सॉलिड आहे. तुझ्या भाई ला आवडली ही तुझी बेस्ट फ्रिएन्ड. लव्ह अट फर्स्ट साइड झालाय मला तुझ्या बेस्ट फ्रिएन्ड सोबत. हर्षु यार माझी सेटिंग लावशील ना तु. तुला म्हाहित आहे ना मी काही वाईट नाहीये. पण तिच्या समोर माझं वाईट इम्प्रेशन पडलं ग. आता काय करूया आपण..?? "भाई मी आहे ना.. मी समजावेळ प्रांजल ला. तु नको टेंशन घेऊस. चल आता घरी जाऊया आई वाट बघत असेल.

इकडे मी निशांत ला मॅसेज केला आणि घरी जायला निघालाच होते की, निशांत चा कॉल आला. "हॅलो मॅडम, कुठे आहेस..?..." अरे मी आता कॉलेज च्या गेट जवळ आहे. घरी जायला निघाली आहे. का.. काय झालं...? सगळ ठीक आहे ना..निशांत..??...... हो सगळं ठीक आहे. तु तिथेच थांब मी येतो," बोलून त्याचा कॉल कट झाला.


मी वाट बघत होते तेवढ्यात निशांत बाईक घेऊन आला. बसा मॅडम. अरे मी आणि बाईक वर... नको.. कोणी पाहिलं तर.. "अरे मी काय तुला पळवुन घेऊन जात नाहीये.. माझं काम आहे तुझ्याकडे म्हणुन बोलतोय. चल आता जास्त भाव नको खाऊस, बस लवकर." मी इकडे तिकडे बघत लगेच बसले. त्यानेही बाईक स्टार्ट केली आणि आम्ही निघालो. "बाय द वे जायचं कुठे आहे आपल्याला...?" जास्त लांब नाही, जरा सामान घ्यायचं आहे माझ्या रूमसाठी. सो तुझी मदत हवी होती. मी फक्त ओके म्हटलं. बाईक वाऱ्याच्या वेगाने धावत होती. त्यामुळे माझे केस माझ्या तोंडावर येत होते आणि मी ते सारखे बाजुला करत होते. हे सगळ निशांत त्याच्या उजव्या काचेतून बघत होता. त्याने एका बाजुला बाईक घेत थांबवली..

"काय झालं..? अजून मार्केट तर आल नाहीये. मग बाईक का थांबवलीस तु..??." त्याने मला उतरायला सांगितलं आणि स्वतःही उतरला. मी मात्र एकटक तो जे करत होता ते बघत होते. त्याने आपल्या जीन्सच्या पॉकेटमधुन रुमाल काढला. "प्रांजल मागे फिर.. मी हात वर करून काय विचारल असता... "फक्त मागे फिर,"तो एवढंच म्हणाला. मी मागे फिरता त्याने माझे सगळे केस जवळ केले आणि आपल्या रुमालाने ते एखाद्या पोनी सारखे बांधले. हे बघून मला मात्र हसु येत होत. "निशांत हे काय होत बर, जे तु आता केलंस..???". मग काय... तुझं मघात पासून जे चालु होत ना, केस बाजूला करण त्यामुळे बाईकवर कॅट्रोल करण कठीण होत होतं. म्हणून हा खटाटोप... चला आता बसा. म्हणून त्याने बाईक स्टार्ट केली आणि आम्ही परत मार्केट च्या दिशेने निघालो.


"प्रांजल तु इथेच उभी रहा. मी बाईक लावून येतो." अस बोलून तो बाईक लावायला गेला. मी देखील तिथल्याच एका शॉपमध्ये गेले. त्या शॉपमध्ये होम डेकोरेशनच्या मौल्यवान वस्तू होत्या. त्यातल्या एका वस्तुवर माझी नजर गेली आणि मला ते खूप आवडल. "ओ काका कितीला दिली ही मूर्ती.??." "तीनशे रुपये..! ते काका बोलले आणि माझे डोळे भलेमोठे झाले. काय....?? अहो काका कमी नाही का काही....बेटा सकाळ पासून खरेदी नाही झाली. काहीच विकल गेलं नाहीये. काय कमी मध्ये देऊ तुला बाळा."


मी काही न बोलता बाहेर आले. बाहेर निशांत मला शोधत होता. मी त्याच्या मागे जात त्याला भौ केलं आणि हा भलताच रागावला..."प्रांजल यार कुठे गेलेलीस.. तुला पाच मिनिटं इथेच थांब बोललो तर गायब झालीस. नशीब सापडलीस नाही तर आता मी तुला कॉल करायला मोबाईल काढला होता. माझ्या डोक्यात तपली मारत तो पुढे जाऊ लागला. मी तिथेच.... त्याने मागे वळून पाहिलं.. आता काय...? अशा चेहऱ्याने बघत मागे आला. "यायचं नाही का मॅडम तुम्हाला..??" मी मात्र तशीच उभी.. मग त्यानेच माझा हात धरला आणि मला ओढतच घेऊन गेला.


निशांत आपण यांच्या दुकानात जाऊया. छान आहेत वस्तु पाहिल्या ना मी आताच... आता मी त्याला खेचत घेऊन गेले. तिथल्या काही वस्तु आम्ही खरेदी केल्या जशा की, कॉफी मग च्या खाली ठेवायचे नक्षीदार स्टँड, एक- दोन शोभेच्या वस्तु. त्याच्या आजी- आजोबांसाठी लाकडी काठ्या. त्याच्या रूमसाठी एक वॉलपेटिंग ही घेतली. लॅम्प ही घेतले. मी पुढे येत वस्तु बिल करण्यासाठी दिल्या.
बघा काका मी माझ्या मित्राला घेऊन आले तुमच्या शॉपमध्ये आणि तुमची बोली ही करून दिली. आता मला जरा डिस्काउंट ही द्या हा. ते काका छान हसत त्यांनी मानेनेच होकार दिला.


मी बाकीच्या वस्तु बघत होते की निशांत ने आपल्या कार्ड ने पेटमें केलं. आम्ही निघालो असता त्या काकांनी मला थांबवलं आणि माझ्या हातात एक बॉक्स दिला. मी हातातल्या बॉक्सकडे फक्त बघत उभी राहिली.


ते काकाच बोलले, "हे माझ्याकडून तुला एक छोटंसं गिफ्ट. आज तु मला छान बोली करून दिलीस ना म्हणुन अस बोलत त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवत ते निघून गेले आपल्या जागेवर. हे अचानक झाल्याने माझे डोळे टचकन भरले, पण मी बाजूला होत आपल्या डोळ्यातील पाणी पुसलं आणि निशांतला माझं गिफ्ट दाखवलं. " बघितलंस निशांत, त्या काकांनी मला गिफ्ट दिल." माझा खुललेला चेहरा बघत निशांत ही छान हसला. मग आम्ही त्याच्या घरी निघालो.


बाईक वर बसून आम्ही एका रस्त्याला लागलो. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला छान बंगले होते. छोटे, मोठे प्रत्येकाला आवडतील तसे त्यांनी ते बांधले असावेत. तशाच एका छान अशा बंगल्या जवळ निशांत थांबला. मी अवाक होऊन तो बंगला बाहेरून बघत होते. काय सुरेख नक्षीकाम केलेला गेट होता. गेट च्या बाहेर नेमप्लेट होतं....."मिस्टर गोपाळ चिटणीस" गेट मधून आम्ही आत गेलो. दोन्ही बाजूला छान गार्डन आणि खुप सुंदर अशी फुलबाग होती आणि मधून बंगल्यात जाण्यासाठीचा रस्ता. मी हे सगळं न्याहाळत चालत होते. आम्ही मेन डोअर जवळ पोहोचलो. त्याने बेल वाजवली.


साधारण दहा मिनिटांनी दरवाजा उघडला गेला. समोर एक साठीतील आजी आमच्या समोर होत्या. "निशु बाळा आलास तु, बर केलंस आलास. तुझे आजोबा बघ मेडिसिन घ्यायला नकार देत आहेत. तूच समजावं त्यांना. आणि स्वतःला कोंडून घेतलं आहे रूममध्ये. किती वेळ झाला माझं काही ऐकत नाही आहेत हे. तूच समजावं आता..." एवढं बोलून त्या आत गेल्या.

आम्ही ही त्यांच्या मागे आत गेलो. निशांत सिड्या चढुन वर गेला. पण मी मात्र तो बंगला न्याहाळत उभी राहिली. संपूर्ण बंगला हा संगमरवरी पासून बनविण्यात आलेला. भिंतींवर खूप जुन्या पण महागड्या असाव्यात अशा वॉलपेंटिंग लावल्या होत्या. समोर बसायला मऊदार गालिचा होता. त्या प्रशस्त अशा हॉलमध्ये मी एकटीच उभी होती हे मला नंतर कळलं. तशी मी देखील वर गेले.


वर निशांत आपल्या आजोबांवर ओरडत होता. "आजोबा तुम्ही बाहेर या नाही तर दरवाजा तोडून मी आत येईन.." आतुन काहीच आवाज येत नव्हता. हे बघून आजींचा चेहरा आता रडवा झालेला बघून मीच पुढाकार घेतला. "निशांत थांब, तु नको मी बोलुन बघते.." "पण प्रांजल तुझं नाही ऐकणार ते.."

मला बोलु तरी दे... त्याने फक्त मानेने बर म्हटलं...
"हॅलो आजोबा... मी प्रांजल... तुम्हाला भेटायला आलीये आणि हे काय तुम्ही आत लपून बसला आहात. मला भेटणार नाहीत का...?? मी तुम्हाला तर तुमच्या बागेबद्दल विचारणार होते. पण मला वाटत आता मला तुम्हाला न भेटताच जावं लावेल." माझं बोलून झाल्यावर आम्ही पाच मिनिटं थांबलो. पण दार काही उघडल गेलं नाही. आता तर मलाही वाटल की,माझही बोलणं व्यर्थ गेलं, आणि अचानक कडी उघडण्याचा आवाज आला. आणि त्यांनी दरवाजा उघडला होता.

दरवाजा उघडून ते बाहेर आले. "कोण मला भेटायला आलय..???" मग मीच पुढे होत त्यांच्या पाय पडले आणि स्वतःचा परिचय करून दिला. अर्धातास होऊन गेला होता मी आणि आजोबा बागेमध्ये बसून गप्पा मारत होतो. निशांत मात्र स्वतःच्या रूमध्ये गेलेला, तर आजी आमच्यासाठी चहा करत होत्या.


"मग प्रांजल बाळा कशी वाटली बाग तुला...??"
आजोबा.! काही बोला पण, तुम्ही बाग एक नंबर बनवली आहे." मला ही शिकवाल ना अस छान छान फुल लावायला. माझं खूप मन आहे छान फुलझाड, फळझाड लावायचं. पण आमच्याकडे जागाच नाहीये. तुमच्याकडे मस्त जागा आहे. मला खूप म्हणजे खुप आवडलं तुमचं घर...

"मग येत जा आमच्याकडे...." मागून आजी येत बोलल्या.
"आजी मी येईन ओ रोज, पण तुमच्या नातवाला नाही आवडायचं... मी सारख आलेल." "त्याच काय करायचं आम्हाला. त्याला नाही वेळ आमच्यासाठी आणि हे घर माझं आहे इथे कोण येणार आणि कोण नाही हे मी ठरवेन हा...आजोबा जोरात बोलले." मी छान स्माईल दिली आणि मान हलवत होकार दिला. काकूंनी आणून दिलेल्या ट्रे मधले दोन कप घेत मी निशांतच्या रूमकडे निघाले. आजी-आजोबा आलेच हा मी.. बघून येते खडूस काय करतोय ते. "बाळा वरच्या साईड चा शेवटचा रूम आहे त्याचा," आजी मागून बोलल्या. मी हो बोलत निघाले.

पायऱ्या चढुन वर गेले. शेवटच्या रूमचा दरवाजा उघडाच होता. मी आत गेले तर निशांत समोरच्या गॅलरीत उभा होता. शर्ट न घातल्याने त्याच जिममध्ये कमवलेलं शरीर दिसत होतं. मी आत जाऊन परत बाहेर गेले आणि त्याला आवाज दिला. तसा त्याने बेड वर पडलेला आपला शर्ट घातला.

"प्रांजल ये ना..." " निशांत हा घे चहा तुझ्यासाठी घेऊन आलीये" त्याने एक कप घेतला आणि बेड वर बसला मी देखील बाजूच्याच एका टेबलावर बसले. चहा पित-पित त्याची रूमवर नजर घालू लागले. "निशांत तुझी रूम छान आहे." "थँक्स प्रांजल.. पण मला तुझीच जास्त आवडली." अरे ते समान कुठे ठेवलंस..???? "काय मॅडम आठवण आली तुम्हाला त्याची...?? नशीब मला वाटलं तु विसरलीस की नक्की कशासाठी तु इकडे आली आहेस ते...." पागल पहिल्यांदाच मी आजी आजोबांना भेटले ना.. चल आता चहा संपव आपण लगेच कामाला लागुया.."


मी चहा संपवत उठली आणि कामाला लागली. त्याने त्या वस्तूंची पिशवी माझ्या हातात देत मलाच सगळं लावायला सांगितलं. "तूच सांग काय कुठे लावूया..."
हे बघ ही पेंटिंग आपण तुझ्या स्टडी टेबच्या वर लावूया. हे तुझ्या टेबलवर जातील. ही सुंदर नक्षीकाम केलेले छोटे- छोटे लॅम्प तुझ्या बुकच्या कपाटाच्या प्रत्येक खनावर ठेवून देऊया. सगळ लावून झालं. कस वाटत आहे...?? छान..!!! त्याने एक मोठी स्माईल देत म्हटलं.

अरेच्चा!!.... हे राहिलाच मी त्या काकांनी दिलेल गिफ्ट त्याच्या हातात दिल. "पण हे तर त्यांनी तुला दिलं ना मग...?. हो पण ते तुझ्याच साठी आहे..... घे आता. मी सरळ तो बॉक्स त्याच्या हातात ठेवला. त्याने उघडला आणि त्यातील वस्तु बघून त्याला ही छान वाटलं.


"निशांत हा नेहमी तुझ्या जवळ ठेव हा. माझा लाडका गणु आहे तो. आणि हो कधी तुला वाटलं ना काही मागावस तर त्याला सांग तो सगळ्या इच्छा पूर्ण करतो. कधी एकट वाटलं तर त्याच्याशी बोल तो सगळं ऐकून घेतो. कळलं का...." निशांत ने एकदा माझ्याकडे आणि एकदा गणु कडे पाहिलं. "थँक्स प्रांजल... खुप सुंदर गिफ्ट आहे हे. मी याला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही"


चला तर आता तुझी पाळी.... मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.. हे तुझ्यासाठी..त्याने ऐक बॉक्स माझ्या हातात ठेवला. मी त्याच्याकडे बघत तो उघडला... त्यात एक फुल आणि त्यावर एक मधमाशी अशी सुंदर दगडात कोरलेली मूर्ती होती.


तुला म्हाहित आहे मी हेच का तुझ्यासाठी घेतलं....मी डोळ्यानेच प्रश्न केला...??? तु ना मला त्या मधमाशी सारखी वाटतेस. प्रत्येक फुलावर बसून त्यातला मध गोळा करतेस. कधी कोणाच्या अध्यात नाहीस की मध्यात. स्वतःच काम बर आणि आपण. अशी आहेस. पण जर का कोणी तुला नडल तर तु त्याला काही सोडत नाहीस. जस की आज केलंस. एक कानाखाली लावून दिलीस ना त्या मुलाच्या. छान केलंस..!


म्हणणे तुला कळलं का..?... मी ओशाळातच त्याच्याकडे पाहिलं. अरे सगळ्यांना कळलं. चलो अच्छा है। बाय द वे मी तुला एक नाव देऊ का...प्लीज...?? मी देखील लगेच होकार दिला. "हनी-बी." म्हणजे...?? अग तुझ्या हातात आहे ना... अरे हो. मी गालातल्या गालात हसले. चला खाली जाऊया. आई-आजोबांसाठी आणलेल्या स्टिक त्यांना देऊ आणि जरा वेळ ही देऊया. नाही तर परत बोलतील स्वतः तर वेळ देत नाही आता या पोरी ला ही स्वतः सारखं बनवेल... यावर मात्र आम्ही दोघे ही हसलो आणि खाली आलो.

गार्डन मध्ये आजी-आजोबा बसले होते गप्पा मारत. मग मी आणि निशांत ही जाऊन बसलो. मी त्या स्टिक त्यांच्या समोर ठेवल्या. त्यांना ही त्या आवडल्या. त्यानंतर खुप गप्पा झाल्या. मी आणि आजोबा.. निशांत आणि आजी अशी टीम करून आम्ही मस्ती करत होतो. यासर्वात वेळ कसा गेला हे देखील कळलं नाही.


"चला मॅडम निघायला हवं नाही तर तुझी आई तुला ओरडायची आणि सोबत मला ही.." मी घडाळ्यात पाहिलं तर संध्याकाळचे पाच वाजता आलेले. मी लगेच उठले आणि जायला निघाले. पण वळून आजोबांकडे बघत बोलले..."मग आजोबा या संडेला मी परत येईन तेव्हा आपण आपली शिकवणी चालु करूया. त्यावर आजोबांची छान कळी खुलली. हे सगळं निशांत बघत होता. मी परत एकदा आजी-आजोबांच्या पाया पडले आणि आम्ही निघालो. ते आम्हाला सोडायला गेट पर्यंत आले. आम्ही बाईकवर बसून निघालो. मी तर घर दिसेनासे होईपर्यंत त्यांना बाय करत होते.


प्रवास करून आम्ही माझ्या घराच्या दिशेने निघालो.... मधेच एका टपरीवर निशांत ने गाडी थांबवली. "ए हनी-बी चहा घेणार का..?? मी लगेच त्याच्याकडे पाहिलं.. आणि मानेनेच होकर दिला. मी बाईकवर बसले होते तो चहाचे कप घेऊन माझ्या जवळ आला आणि त्यातला एक कप माझ्याकडे दिला. मग कसा गेला दिवस..?..त्याने समोर बघत विचारले...."निशांत खूप छान..! एवढ्या छान कधीच नव्हता गेला. थँक्स.


निशांत मी या संडेला तुझ्या घरी आलेलं तुला चालेल ना..?? मी आजोबांना प्रॉमिस करून आलीये.. त्याने इकडे तिकडे बघितल... हो ग ये. तुला घरी नेलं म्हणजे आता तुला कधीही यायची परवानगी आहे मॅडम... मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं... सांगेल कधी तरी. आजच सांगायचं आहे का सगळं..घरी नाही का जायचं तुला...उशीर झाला आहे. लेट झाला ना तर आईचा ओरडा खा. आईच नाव येताच मी पटकन बाईकवर बसले. आणि आम्ही माझ्या एरियामध्ये दाखल झालो. "येतोस घरी..??" आज नको नेक्स्ट टाईम येईल. अस बोलून तो निघून गेला. मी देखील निघाले. नाचत, गात बिल्डिंगमध्ये घुसले. दारावरची बेड वाजवताच समोर आई.. मी आई ला जवळ घेऊन तिच्यासोबत नाचु लागले. आईचा हात हातात घेत तिला कधी जवळ कधी लांब करत होते...


"अग काय हे...." काय आज स्वारी एवढी खुश कशी काय..?? सांगते...सांगते आई..मी अजून ही नाचतात होते. मी सोफ्यावर बसले. आई देखील येऊन बाजूला बसली. "मी आज ना निशांत च्या घरी गेले होते. "आपल्या निशांत च्या घरी..???" काय ग त्याची तब्बेत ठीक आहे ना..? मला सांगायचं ना मी देखील आले असते.., काय झालं त्याला..?? "अग आई त्याला काही झालं नाही.. तो मस्त मज्जेत आहे. आई मी आधी फ्रेश होते आणि नंतर तुला सगळं सांगते. ठीक आहे. अस बोलून मी माझ्या रूममध्ये गेली. नकळत माझा हात माझ्या केसात गेला आणि माझ्या हाताला त्याने बांधलेला रुमाल लागला. अरे...!!रुमाल तर राहिलाच...मी स्वतःशीच हसत तो माझ्या कपाटात ठेवुन दिला.


फ्रेश होऊन मी किचनमध्ये गेले. आई जेवण करण्यात बिझी होती. मग मी देखील तिला मदत करायला लागले. जेवण बनवून आम्ही हॉलमध्ये बसलो. मी सांगायला सुरुवात केली. "अग आई त्याने ना एकदा मला सांगितले होते की, त्याची रूम डेकोरेत करायची आहे. म्हणुन आज लवकर लेक्चर्स संपले. (कॉलेजमधला किस्सा मी आज लपवला नाही तर ही जास्त टेंशन घेईल) मग आम्ही दोघे मार्केटमध्ये गेलो आणि तिथून त्याच्या घरी. अग आई त्याच घर म्हणजे आपल्या सारख नाही बिल्डींगमध्ये त्यांचा स्वतःचा बंगला आहे. वाह..!! ... आई.


निशांतला आई बाबा नाहीत. त्याच्या आजी-आजोबांनीच त्याला वाढवलं आहे. हे ऐकून मात्र आईला बरच वाईट वाटलं. पण त्याचे आजी-आजोबा कमाल आहेत. माझी तर छान गट्टी जमली आहे त्यांच्याशी, आणि मी मग काय काय झालं हे तिला सांगितलं. माझ्या प्रत्येक वाक्यावर तिचे हावभाव बदलत होते. आई अग या संडे ला ही मी त्यांच्याकडे जाणार आहे. ते मला गार्डनिंग शिकवणार आहेत..जाऊ ना ग आई..??" मग आई ने विचार केला आणि होकार दिला. मी लगेच आई ला मिठी मारली. " पण त्यांच्यासाठी काही तरी घेऊन जा अशीच जाऊ नकोस." मी देखील होकार दिला आणि आम्ही जेवायला गेलो. आज बाबा ही होते जेवायला. आम्ही छान गप्पा मारून जेवण आटपल. आई ला मदत करून मी माझ्या रूममध्ये आले.

बॅगेमधुन निशांत ने दिलेल गिफ्ट काढून परत एकदा त्याला पाहिलं.... आणि माझ्या स्टडी टेबलवर ठेवून दिल. खडूस... काय बोलतो मला म्हणे मी..,"हनी-बी" आहे. पागलच आहे. पण गोड आहे.. मी मनाशी बोलत बेडवर आडवी झाली. दिवसभराच्या आठवणींची मनात उजळणी करत स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेले....... चेहऱ्यावर एक छान अशी स्माईल होती.

to be continued.......

(कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. हा भाग कसा वाटला हे करून नक्की सांगा.)


स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग गाईज.