Naa kavle kadhi - 1-35 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 1 - Part 35

    सिद्धांत सकाळी उठून छान तयार झाला. आज संध्याकाळची तो फार आतुरतेने वाट पाहत होता. इकडे आर्याला जास्त काही फरक पडत नव्हता कारण सिद्धांत बोलेल की नाही ह्या वर तिला अजूनही शंका होती, पण ती खुश मात्र होती. ती तयार होत असतानाच तीचं लक्ष तिच्या डायरीकडे गेलं आणि तिने डायरी हातात घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. 'किती वेडा आहे सिद्धांत. इतकं वाचलं तरीही बोलू नाही शकला, कस होणार ह्याच.. ह्याला फक्त राग व्यक्त करता येतो. प्रेम करू शकतो पण व्यक्त नाही करता येत. बघू आज संध्याकाळी काय देतो प्रश्नांची उत्तरं.....' 'काय ग दीदी, अस एकटीच काय हसतीये.. बरी आहेस न?', आयुषच्या आवाजाने आर्या भानावर आली. 'नाही रे काही नाही असच आपलं', आर्या म्हणाली. 'if I'm not wrong, सिद्धांतचा विचार चालू होता ना?', आयुष म्हणाला. 'तुला कस कळालं?', आर्या बोलून गेली. 'म्हणजे त्याचाच विचार चालू होता.', आयुष म्हणाला. 'नाही मी त्याचा विचार का करेल?' आर्याने सांभाळण्याचा प्रयत्न केला. 'तू त्याचाच विचार करणार आता आणि का हे मी सांगायला नको. काय तुमची स्टोरी पुढे गेली की नाही?' त्याने विचारलं. 'कसली स्टोरी आणि कसल काय?', आर्या म्हणाली. 'म्हणजे त्याने तुला अजून साधं propose पण नाही केलं!!!' 'नाही', आर्या म्हणाली. 'काय यार हा!! इतकं साधं काम नाही जमत त्याला. काहीही नाही करू शकत तो आयुष्यात.', आयुष म्हणाला. 'त्याने आयुष्यात खूप काही केलं आहे आयुष.. success काय असत ह्याच उत्तम उदाहरण आहे तो, so बोलण्याआधी विचार कर आपण कोणा बद्दल बोलतोय आणि असेल त्याच्या डोक्यात काही वेगळं', आर्या त्याला रागातच म्हणाली. 'बापरे आता पासूनच इतकी बाजू घेते त्याची! कमाल आहे बाबा तुझी. एका मुलासाठी तू चक्क तुझ्या भावाला भांडतीये कळतंय का तुला! माझी बहिण आता माझी नाही राहिली, आता कोणीच नाही माझं', आयुष बोलत होता. 'ए काय लावलं रे सकाळी सकाळी!! काय फालतू dialogues मारतोय. तुला आज काही अभ्यास, कॉलेज नाही आहे का?', आर्या म्हणाली. 'आहे गं, पण तुझ्या आयुष्यापेक्षा दुसरं काही महत्त्वाच आहे का?', आयुष तिला म्हणाला. 'बरं इतकी नको हं माझ्या आयुष्याची काळजी करू. मी समर्थ आहे त्याला. तू तुझं काम कर.', आर्या त्याला म्हणाली. 'बोलून घे माझ्या समोर असंही सिद्धांत समोर तुला काहीच बोलता येत नाही. त्याचंच ऐकावं लागतं', आयुष म्हणाला. 'मी काही घाबरत नाही त्याला, तो काही राक्षस आहे का? काहीही म्हणे त्याला घाबरते.', आर्या म्हणाली. 'nice joke अजून एक' आयुष तिला म्हणाला. 'आयुष तू निघ बरं. तुझं तुझं काम कर ! मला ऑफिस ला निघायचं आहे. उशीर झाला तर जमदग्नी भडकेल त्याचा',आर्या म्हणाली. 'म्हंटल न मी तुला की तू घाबरते.', आयुष तिला चिडवीत म्हणाला. 'मीच निघते तुझ्याशी असंही डोकं लावून काही फायदा नाही', आणि ती निघाली. 'bye दीदी alll the best!!!', आयुष मागून ओरडला. 'bye thank youu!!!!', अस म्हणून ती निघाली.
      ऑफिसला आल्या आल्या ती सिद्धांतला भेटायला गेली. 'happy birthday सिद्धांत!!!!' तिने त्याला wish केलं. 'thank you आर्या.' 'काय आणि रात्री फोन का बंद होता तुझा मी किती try केला', आर्या त्याला म्हणाली. 'अगं सकाळी उठायचं असतं  आणि रात्री wish करणारे परत सकाळी भेटले की wish करतातच मग उगाचच आपली पण झोप खराब करायची आणि त्यांची पण. म्ह्णून मी बंद फोन करून ठेवतो.', सिध्दांत म्हणाला. 'seriously तुझं काहीही होऊ शकत नाही, एक दिवस असतो तेवढा आणि त्या दिवशीही फोन बंद ठेवायचा काय अर्थ आहे ह्याला?' आर्या म्हणाली. 'हे बघ आर्या, तू केलं ना आता wish. पोहचल्या तुझ्या शुभेच्छा माझ्यापर्यंत! तू तर तशीही माझी हितचिंतक आहेस मग 12 ला च शुभेच्छा द्यायचं काय एवढं! बर आता हा विषय  ठेव बाजूला आणि कामावर लक्ष केंद्रित कर! आज बरंच काम आहे.', सिद्धांत तिला म्हणाला. हो करते म्हणून ती निघाली तिथून 'किती professional आहे सिद्धांत. अजिबात कामाच्या वेळेस timepass करत नाही आणि करूही देत नाही.', तिने तिचे कामे पटापट संपवले आणि संध्याकाळी घरी जायला निघाली. तो ही आपले काम आटपून घरी गेला. जाताना मात्र आर्यला सांगायला तो विसरला नाही की पार्टीला नक्की ये. ती ही हो म्हणाली.
         पार्टी मध्ये सगळे जण आले होते.. आर्या सोडून, सिद्धांत तिची आतुरतेने वाट बघत होता. 'किती उशीर करतीये ही.' 'काय सिद्धांत, कुणाची इतकी वाट बघण चाललंय.' विक्रांत त्याला म्हणाला. 'अरे आर्या नाही आली ना अजून' सिद्धांत म्हणाला. 'काय? आर्या इथे येणार आहे? पण तिचा काय संबंध? म्हणजे तू ऑफिस मधले पण invite केले का?' 'नाही फक्त आर्या.' 'ओहहह!! अरे आर्या असणारच ना मी पण काय मूर्ख आहे', विक्रांत म्हणाला. सिद्धांतच आज विक्रांतच्या बोलण्याकडे काहीही लक्ष नव्हतं. विक्रांतला ही ते जाणवलं 'जाऊ द्या. आपला काहीही बोलून फायदा नाही आहे आज. हा त्याचाच धुंदीत आहे.' असं म्हणून तो निघाला. आर्या as usual  छानच तयार होऊन आली. पण आज चेहऱ्यावर एक वेगळाच glow होता. 'प्रत्येक वेळेस पाहिल्यावर पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावं अशीच आहेस आर्या तू!', सिद्धांत तिच्या कडे पाहून मनातच म्हणाला. पार्टी एकंदरीत चांगली चालली होती. पण आर्याच्या सिद्धांत आणि विक्रांत सोडलं तर बाकी कुणीही ओळखीचं नव्हतं त्यामुळे तिला थोडं बोरच होत होतं. पण ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिला खर तर निघूनही जावं वाटत होतं पण केवळ आणि केवळ ती सिद्धांतसाठी थांबली होती. हळू हळू सगळे जात होते, आर्या ही सिद्धांतला म्हणाली 'चल मी ही निघू?', कारण तिने आता अपेक्षाच सोडली होती की का काही सांगेल. त्याने तिचा हात पकडला,  'थांब आर्या! कुठे निघालीस? अग बरेच उत्तरे मिळणार आहेत तुला ऐकायचे नाही?', आर्याचे heartbeats  वाढत होते. 'विचार आर्या आज तुला काय विचारायचं ते विचार. मी आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे.' सिद्धांत तिला म्हणाला. आर्याला काय विचारावं काहीही सुचत नव्हतं, तिला खर तर खूप काही बोलायचं होतं पण काहीही सुचत नव्हतं. 'अग बोल.. विचार..', सिद्धांत तिला म्हणाला. 'मी आधीच बरेच प्रश्न विचारले होते, त्यांचीच उत्तरे हवी आहेत मला', आर्या म्हणाली. 'हो तुला प्रश्न पडायचे ना की अस का होतं? अस का होत की तुला कोणी बोललं की फरक मला का पडतो? तुला थोडही लागलं की त्रास मला का होतो? तू दिसली नाही की मी खूप बेचैन होतो? इतकी काळजी का वाटते तुझी?' सिद्धांत जसा जसा बोलत होता आर्याची धडधड आणखीन वाढत होती. 'विचार ना का???',  सिद्धांत म्हणाला. 'का अस होत?' आर्याने विचारलं. 'Because *I love you* dammit......!!!!!!!!!', आर्याचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. 'काय म्हणाला.. परत बोल' ती त्याला म्हणाली. 'I love you so much. I just want to be with you, आता मी माझ्या आयुष्याची तुझ्या शिवाय कल्पनाच नाही करू शकत, तू मला जगणं शिकवलं आर्या! तू मला माणसात आणलं. पूर्वी कधीही न केलेल्या गोष्टी मी फक्त आणि फक्त तुझ्या साठी केल्या. thank you so much आर्या! तू नसतिस तर माझा पुन्हा नात्यांवर विश्वास कधी बसलाच नसता, मला इतकं चांगलं समजून घेण्यासाठी, माझ्या प्रत्येक चुकीला माफ करण्यासाठी, तू खरच खूप ग्रेट आहेस आर्या and thats why I love you!  आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी मला तुझी साथ हवी आहे. देशील मला ती ??', त्याने विचारलं. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आणि ओठांवर हसू होत. तिने क्षणाचाही विलंब न लावता त्याला मिठी मारली. 'किती वाट बघायला लावली मला ह्या क्षणाची. किती छळलस रे मला! खर सांगू का मी ही नाही जगू शकत आता तुझ्या शिवाय. जितकं तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तितकीच तुझ्या जवळ आले. इतकी की तुझा रागही हवाहवासा वाटू लागला. माझं मलाच कळलं नाही की कधी तुझी होऊन गेले.', ती रडतच बोलत होती. सिद्धांतने तिचे डोळे पुसले 'अग वेडे रडतेस काय? तू खरच रडकी आहेस', तो हसत म्हणाला. 'आनंदाश्रू आहेत रे हे!' 'नको!! मला ह्या नंतर तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू पहायचे नाही. कारण हसणारी आर्या मला जास्त आवडते. त्या साठी मी माझा रागही कमी करेन', सिद्धांत म्हणाला. 'अजिबात नाही. मला नाही आवडणार तू स्वतःला बदललेलं' आर्या म्हणाली. 'कारण माझं ह्या सिद्धांत वर प्रेम आहे आणि हा च हवा आहे मला.' तिने अस म्हंटल्यावर सिद्धांतने पुन्हा तिला जवळ ओढलं आणि म्हणाला,  'now you are mine'  तीने मागे जाण्याचा प्रयत्न केला 'का विश्वास नाही आहे', तो म्हणाला. 'आहेच', ती  म्हणाली. 'आणि मी तो कधीच तुटू देणार नाही', असं म्हणून त्याने तिला सोडलं. 'चल निघायचं', आर्या म्हणाली, 'मला तर तुला सोडून जाण्याची अजिबात ईच्छा नाही आहे', तो तिला म्हणाला. 'हो लग्नानंतर सोबतच राहायचं आहे आता चल आपापल्या घरी.', 'ओहहह इतकी घाई झाली आहे आर्या तुला लग्नाची!', तो परत तिच्या जवळ जात म्हणाला. ती थोडीशी लाजली अन म्हणाली, 'तू ना बरोबर मला शब्दात पकडतो.' 'आता कायमच पकडलं आहे मी. तुला अस नाही सोडणार', तो म्हणाला 'आणि चल जाऊया. आईला ही आता सांगायला हवं की तुझ्या सुनेचा शोध संपला', आणि दोघेही निघाले त्यांच्या पुढच्या प्रवासाला.

-------------------समाप्त-----------------------------