Parmeshwrache Astitva - 5 books and stories free download online pdf in Marathi

परमेश्वराचे अस्तित्व - ५

"चिंतन"
" आपुली तहान भूक नेणे । तान्हाया निके ते माऊलीस करणे । तैसे अनुसरले
ते मज प्रणे । तयाचे सर्व मी करिन । ( श्री ज्ञानेश्वरी)
अर्थ :-आपली तहान भूक न जाणता,आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते.त्याच
प्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भार मजवर
टाकला त्या सर्वांचे इच्छित मीच पूर्ण करतो.
वृक्षांच्या शाखा व पाने एकाच बीजापासून उत्पन्न झालेली असतात परंतु
पाणी मुळापाशी घालावे लागते.परमेश्वराला
नीट समजून नाम जपाचे पाणी घालून एकचित्त होऊन साधना केली पाहिजे.
भगवंताची पूजा करतांना पान, फळ अथवा
पाणी जरी शुद्ध भावनेने अर्पण केले तरी
त्यास प्रिय होते.
परमेश्वराचे चिंतन करण्याचा महिमा
अगाध आहे.चिंतन करण्याने आधी, व्याधी
तुटतात.सिद्धी प्राप्त होते.चिंतनाने नाना
विघ्ने दूर होतात."म्हणोनी करावे चिंतन काया
वाचा आणि माने." चिंतनाने नाना विघ्ने दूर
होतात तसेच नाम जपाचे महत्व अनन्य साधारण आहे.अजामेळ, गणिका,भक्त प्रल्हाद, धृव हे सगळे नामा मुळेच तरले.
एक नाम सतत घेत राहिल्याने, काम,क्रोध,
मोह,मत्सर हे दूर होतात.आपले अनेक दोष
नाहीसे होतात.
सगुण उपासना नेहमी श्रेष्ठ आहे.निर्गुण उपासना करणारे जे असतात
त्यांना फार कष्ट सोसा
वे लागतात,काम,क्रोध
उपद्रव देतात.निराकार ब्रम्हाची प्राप्ती होण्या
करिता त्यांना ब्रम्हाशी, शून्याशी झटावे लागते.(आकाशाशी) तहान लागली असता
तीच पिऊन तृप्त व्हावे लागते.भूक लागली
असता तीच खाऊन समाधान मानावे लागते.
थंडी नेसणे,उन पांघरने, पावसात बसने. असे
कष्ट सोसावे लागतात.म्हणून भक्ती मार्गाचा
स्वीकार केला पाहीजे.त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाहीत"नाम रुपी नौकाच
संसारातून तारून नेऊ शकते.
"पयाथाग्नी सुसमृद्धार्चि करोत्येधासि भस्मसात । तथा मद्विशया भक्तिरुन्नवैनांसि
सकृत्स्नश:"।।
अर्थ:-धगधगता अग्नी जशी सर्व जळणाची
राख करून टाकतो,त्याच प्रमाणे माझी भक्ती
सुद्धा पापांचा राशी जाळून टाकते.इतकी
भक्ती श्रेष्ठ आहे. त्या करिता भक्ती अनन्य
भावाने केली पाहिजे.
सोने ज्या प्रमाणे अग्नीने आपल्यातील
मळ टाकून देऊन शुद्ध होते आणि खऱ्या रूपाने चमकू लागते त्याच प्रमाणे मनुष्य
जेंव्हा भगवंताची भक्ती करतो तेंव्हा त्या
भक्ती योगानें कर्म वासनांचा नाश होऊन
निज स्वरूप असलेल्या आत्म्याला प्राप्त
होतो.
राग,द्वेष,लोभ,शोक,मोह,माया,मद, मान
अपमान,दुसऱ्याच्या गुणात दोषपाहणे,कपट,
हिंसा,मत्सर,दुराग्रह,प्रमाद,भूक आणि निद्रा
हे जीवनाचे शत्रू आहेत.त्यामध्ये रजो गुण,
तमी,गुण प्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत काही
वेळा सत्व गुण प्रधान वृत्ती सुद्धा शत्रू होतात.
ज्ञानाच्या तीक्ष्ण तलवारीने भगवंताच्या
बळावर या शत्रूंचा नाश करावा.
बैसोनि निवांत कारि चिंतन । काया वाचे
मने सहित.(संत चोखा मेळा)
निवांत जागी शांतपणे बसून एकाग्र मनाने
भगवंताचे चिंतन कराव
जसे दह्याचे मंथन करून नवनीत (लोणी)तयार होते.त्याच प्रमाणे नामाचे
मंथन करावे,म्हणजे परमेश्वर दूर नाही.
भक्ती करतांना भाव अति महत्वाचा आहे"
"भावेविण देव न कळे निःसंदेह,सत्संग पाहिजे"
" ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ
विरळा जाणे"(संत ज्ञानेश्वर)
कोणी कितीही तीर्थयात्रा केल्या किंव्हा
त्रिवेणी संगमात स्नान केले व परमेश्वर
चिंतन नसेल तर सर्व व्यर्थ आहे .
"माला फेरत जग भया,फिरा न मन का फेर । कारका मनका डार दे,मन का मन का
फेर।
अर्थ:--हाता मध्ये मोत्याची माळ घेऊन नुसते
मोती फिरवतात.परंतु त्यांच्या मनातील भाव
बदलत नाहीत,मन इकडे तिकडे भटकते
शांत राहात नाही(जप करण्यात लक्ष नाही)
अशा प्रकारे नुसते माळेचे मणी(मोती)
फिरवण्या ऐवाजी मनाचे मोती बदला.
(श्री संत कबिरदास)
" मन जाणे,सब बात जाणत है अवगुण कारे । काहे की कुशलात कर दीपक कुवे
पडे ।।
अर्थ:-माणसाचे मन सर्व गोष्टी जाणत असते
(चांगले काय,वाईट काय) तरी सुद्धा ते अवगुणा मध्ये फसते.दुर्गुणात अडकते.
जसा एखाद्याच्या हातात दिवा असून सुद्धा
तो विहिरीत पडतो.तो कुशल कसा?
आपले आचरण विचार उच्च कोटीचे
पाहिजेत नाहीतर जन्माचा फायदा काय?
जसे सोन्याच्या कलशात दारू ठेवावी तसे
होते.
संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्राणिया भोगल्यावीण । या लागी करावे हरिचे स्मरण । तुटेल बंधन मग त्याचे ।।
(संत तुकाराम)
क्रियमाण म्हणजे आपण वर्तमान काळात जे कर्म करतो,चांगले अथवा वाईट,
ते कर्म जमा होते त्याला संचित म्हणतात.
तेच प्रारब्ध म्हणून आपल्या वाट्यास येते.
म्हणून संचित चांगले असेल तर प्रारब्ध
चांगले आणि संचित वाईट असेल तर प्रारब्ध
वाईट.नेहमी लक्षात ठेवा भविष्य काळ वर्तमान काळात जमा होतो व वर्तमान काळ
भूतकाळात जमा होतो.म्हणून वर्तमान काळात सत्कर्म करून परमेश्वराचे स्मरण
करावे नाम जप करावा.
" अखंड वाणी स्मरणी। सुखी विश्रांती
किर्तनी । खेचर विसोबा म्हणे । मनुष्य
देह दुर्लभ."(विसोबा खेचर)
मनुष्य देह हा दुर्लभ आहे म्हणून या
जन्मात सत्कर्म करीत राहावे.काळ अनुकूल
असो वा प्रतिकूल आपले धैर्य बळ न सोडता
सदाचरण करून मनो भावे एकचित्त होऊन
परमेश्वराचे चिंतन करावे.भवसागर सहज
पार होईल.याचा अनुभव येईल प्रचिती
येईल.
काया,वाचा , मने अंतरबाह्य शुचिर्भूत होऊन त्या विश्वेश्वराला अभिवादन करून
नित्य चिंतन केले तर,तो दयाघन कृपेचा
वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही.
दीनासाठी
दीन, मोठया साठी मोठा,लहाना साठी लहान
बनणारा तो परमभक्तवत्सल आपली उपेक्षा
करील असे मनातही आणू नका.निष्टेने,
श्रद्धेने आणि विश्वासाने त्याच्या त्रैलोक्यपावन चरणकमलाजवळ विनम्र व्हा
की तुमचे काम झालेच
रुद्रा मध्ये आनिर्हत व,आमिवत्क असे दोन शब्द आलेले आहेत.आनिर्हत म्हणजे
भक्तांचे अशेष दुरीत हरण करणारे व तपश्चर्येने अनेक जन्मार्जित दुष्कृतराशींचा
नाश होतो तसा नाश करण्यास साहाय्यभूत
होणारे.आमीवत्क म्हणजे अमर्याद प्राप्ती
परमेश्वर प्रसन्न झाला की त्याच्या देण्याला
सीमा राहत नाही.
"अनंत हस्ते कमलावराने देता,किती घेशील
दो कराने."
परमेश्वराची अनंत रूपे,अनंत आकार,व
अनंत कार्ये याचा मानवाच्या पामर बुद्धीला
अर्थ तो काय कळणार व त्याचे आकलन तरी
कसे होणार?
"यौ बुद्धे:परतस्तु स:" आशा इंद्रिये आणि बुद्धी यांच्याही पलीकडे असणाऱ्या आशा त्या महन्मगलकरुणासागर प्रभूंचे दर्शन
होण्यासाठीच या विश्वातील प्रत्येक आणू-रेणु
आणि पदार्थ यांच्या मध्ये व्यापून राहिलेल्या
त्या जगदात्मा जगदिशाची आराधना करण्यास ऋषी सांगतात.
सुधाकर काटेकर
9653219353