ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 7

क्रमशः

काही वेळातच त्यांची गाडी महाबळेश्वरचे त्या हॉटेलवर जाऊन पोहोचते. प्रीती आणि तिची फॅमिली मग आपले सगळ्या बॅगा घेऊन हॉटेलचे रिसेप्शन काउंटरवर हॉटेलचे रूमची चावी घेण्यासाठी जातात. रूमची चावी घेऊन हॉटेलचे रूम नं ५०१ कडे जाताना न राहून पुन्हा पुन्हा प्रीतीची नजर त्या शेजारचे रूम नं ५०२ कडे जाते. तिची पावले अलगद त्या रूम नं ५०२ कडे वळतात आणि ती त्या रूम नं ५०२ चा दरवाजा उघडण्यासाठी त्या रूमचे दरवाजाला हात लावणार तोच "मॅडम.. मॅडम.. आहो तुमची रूम इकडे आहे... त्याचे बाजूची.." त्यांना रूम दाखवण्यासाठी आलेला हॉटेलचा कर्मचारी प्रीतीला बोलतो. तो आवाज ऐकून प्रीती तिथेच क्षणभर थांबते रूम नं ५०२ चे दरवाजा जवळच. तिची खूप इच्छा होती की, आपण या हॉटेलचे त्याच रूममध्ये रहावे पण ती रूम अगोदरच कोणीतरी आरक्षित केलेली असलेमुळे प्रीतीला ती रूम मिळालेली नसते. मग प्रीती तिचे फॅमिली सोबत शेजारचे त्या रूम नं ५०१ मध्ये फ्रेश होण्यासाठी जातात.

 

मनाच्या एक चोर कप्प्यात 

आठवणींच्या एका वहीत 

आजही जपून ठेवलेत मी 

पहिल्या प्रेमाच्या त्या गोड साठवणी..

 

काही वेळानी ते सगळे फ्रेश होऊन आवरून हॉटेलचे रूम नं ५०१ मधून महाबळेश्वरमधील भटकंतीसाठी बाहेर पडत असतात. रूम मधून बाहेर पडलेवर देखील प्रीतीची नजर सारखी वळून-वळून त्या हॉटेलचे रूम नं ५०२ कडे जात असते पण तेव्हा देखील त्या रूम नं ५०२ चा दरवाजा बंदच असतो. प्रीती आपल्या मुलीला प्रतिक्षा आणि आपले आई बाबांना घेऊन महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडते. कॉलेजचे पिकनिकमध्ये आर्यन आणि प्रीतीने महाबळेश्वर मधील असे कोणतेच ठिकाण सोडलेले नसते जिथे ते दोघे एकमेकांचा हात हातात पकडून फिरलेले नसतात. महाबळेश्वरमध्ये जिथे जिथे प्रीती आणि तिची फॅमिली भटकंतीला जात होते त्या प्रत्येक ठिकाणी जाईल तेथे प्रीतीने तिचे मनातील एक कप्प्यात फार दिवसांपासून जपून ठेवलेल्या आठवणींच्या डायरीचे एक एक पान तिचे डोळ्यांसमोर समोर हळूच अलगद उलगडत जात होते. महाबळेश्वर मधील त्या प्रत्येक ठिकाणी प्रीती तिच्या पहिल्या प्रेमाच्या गोड गुलाबी आठवणींना पुन्हा पुन्हा भेटत होती..

 

महाबळेश्वरमधील हिरव्यागार त्या निसर्ग सौंदर्याची भटकंती करून आलेवर संध्याकाळी प्रीती आणि तिची फॅमिली हॉटेल जवळ येऊन पोहोचते. हॉटेलकडे जात असताना प्रीती मधेच थांबते आणि आपल्या मुलीला प्रतिक्षाला आपल्या आईकडे देते व आई बाबांना "आई-बाबा तुम्ही चला पुढे.. मी आलेच लगेच.." असे बोलून ती त्यांना हॉटेलमध्ये जायला सांगते. मग प्रीती तिथूनच थोडेसे पुढे जाते तिथे छान मस्त हिरवीगर्द घनदाट झाडी असते आणि तेथील एका छत्री सारखे आपल्याच सभोताली छान पसरलेल्या झाडाखाली बसण्यासाठी एक छोटसं बाकडे ठेवलेले असते. प्रीती त्या बाकड्याच्या दिशेने जाते आणि पहाते तर काय.. त्या झाडाखालील बाकड्यावर ती तेथे पोहोचण्या अगोदरच कोणीतरी बसलेले असते. प्रीतीला त्या बाकड्यावर थोडावेळ निवांत बसायचं असते त्या हिरव्यागर्द झाडांच्या सानिध्यात थोडावेळ तिला एकटीला घालवायचा असतो, पण त्या बाकड्यावर अगोदरच एक व्यक्ती सूर्यास्त पाहत बसलेली असते. प्रीतीचे मनात विचार येतो की, आपण त्या व्यक्तीला त्या बाकड्यावरून उठवावे तरी कसे आणि त्या बाकड्यावर असे त्या व्यक्तीचे बाजूला जाऊन असे बसणेही बरोबर नाही वाटणार.. या विचारातच प्रीती तेथून मागे फिरते आणि मग पुन्हा थोडावेळ तिथेच थांबते. ती व्यक्ती त्या झाडाखालील बाकड्यावरून उठते का? हे पाहण्यासाठी ती थोडावेळ तिथेच बाजूला वाट पहात उभी राहते..

 

सर्वांगांत प्रेमाचे जणू तरंग उठलेले 

मनाचे कारंजे आकाशी उंच उडलेले

तुझ्या बाहुपाशात जणू स्वर्ग सुखच लाभलेले 

तुझे ओठ जेव्हा माझ्या ओठांना बिलगलेले..

 

प्रीती बराच वेळ तिथे झाडाखालील त्या बाकड्यावर बसलेली ती व्यक्ती उठण्याची वाट पहात असते पण ती व्यक्ती मात्र तो मावळतीचा सूर्य पाहण्यात स्वतःला हरवून गेलेली असते. प्रीतीला काय करावं काहीच सुचत नसते. तिला तर त्या बाकड्यावर बसून थोडा वेळ व्यथित करायचा असतो आणि याला कारणही काहीस तसेच असते. याच बाकड्यावर बसून कॉलेजचे पिकनिकमध्ये आर्यननी प्रीतीला कॉलेज नंतर तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिलेले असते आणि त्यानंतर याच बाकड्यावर प्रीती आर्यनचे ओठ त्यांच्या पहिल्या-वहिल्या चुंबनात त्या गोड गुलाबी थंडीत एकमेकांना बिलगलेले होते. म्हणून प्रीतीला थोडा वेळ का असेना पण त्या झाडाखालील बाकड्यावर बसून पुन्हा त्या पूर्वीच्या गोड गुलाबी आठवणींना उजाळा द्यायचा होता. पण ती व्यक्ती अजूनही तो सूर्यास्त पाहण्यातच मग्न होती. बराच वेळ वाट पाहून शेवटी कंटाळलेली प्रीती मग आपल्याच मनाशी उद्या पुन्हा या ठिकाणी येण्याचा निश्चय करत हॉटेलच्या दिशेने निघून जाते.

 

इकडे हॉटेलवर पोहोचलेवर प्रीती आपल्या रूमवर जाताना पुन्हा तिची नजर आपोआपच त्या रूम नं ५०२ कडे वळते. तेव्हाही त्या रूम नं ५०२ चा दरवाजा बंदच असतो. ती त्या रूम नं ५०२ चे दरवाजा जवळ जाते आणि त्या रूमचा दरवाजा तिचे हाताने उघडणार इतकेतच तिला तिचे मुलीचा प्रतिक्षाचा रडण्याचा आवाज कानावर पडतो. तिचा रडण्याचा आवाज ऐकून प्रीती तेथून तशीच चटकन प्रतिक्षाला घेण्यासाठी आपल्या रूम नं ५०१ मध्ये निघून जाते. रूममध्ये गेलेवर प्रीती प्रतिक्षाला मांडीवर झोपवत-झोपवत तिचे आई-बाबांशी बोलून उद्या सकाळी आवरून बोटींग करण्यासाठी जायचं ठरवते. बोटींग करून झालेवर मग मार्केटमध्ये थोडी खरेदी करून संध्याकाळी पाच-सहा चे दरम्यान घरी परत जायला निघायचे ठरवतात. प्रीती तिचे मुलीला प्रतिक्षाला झोप लागलेवर हॉटेलमधून त्यांचे रूमवरच रात्रीचे जेवणाची ऑर्डर मागवते. जेवण आलेनंतर रूममध्येच ते सगळे एकत्र रात्रीचे जेवण करून त्यांचे रूममध्ये झोपण्यासाठी ते एक जादा बेड मागवून झोपी जातात.

 

बंद डोळ्यांना 

तुझी स्वप्ने जागवतात..

आणि 

उघड्या डोळ्यांना

तुझ्या आठवणी सतावतात..

नको ना रे असा सतावू 

आता बस्स हा दुरावा

पुरे झाला ना रे हा लपंडाव

सांग ना रे का..

राहून राहून मनाला

त्याच गोष्टी सारख्या का आठवतात..

 

सकाळचा प्रवास आणि दिवसभर बाहेर फिरलेमुळे प्रतिक्षा आणि प्रीतीचे आई बाबा तर गाढ झोपी जातात पण प्रीतीला मात्र काही केल्या झोपच लागत नसते. झोप येत नसलेले पुन्हा ती आपल्या कॉलेजचे महाबळेश्वर पिकनिकचे ते जुने फोटो मोबाईलवर पहात बसते. त्या पिकनिकचे फोटोज पहात असताना तिला तिचा त्या पिकनिक मधील तो गुलाबी नाईट ड्रेस मधील फोटो सापडतो. तो फोटो पाहून तिला त्या गुलाबी थंडीतील आर्यन सोबत घालवलेली ती गुलाबी रात्र आठवते आणि ती लगेचच आपल्या बॅगमधील आर्यनने गिफ्ट दिलेला असतो तो गुलाबी नाईट ड्रेस घालते. रात्री थंडी खूप असते आणि प्रीतीला हॉटेलचे त्या रूममध्ये झोपही लागत नसते. शेवटी ती कंटाळून आपल्या अंगा भोवती एक शाल लपेटून रूमच्या समोरच बाहेर बाल्कनीत जाऊन मोबाईल मधील गाणी ऐकत उभी राहते आणि इतकेतच मागून कसला तरी आवाज येतो. प्रीती मागे वळून पहाते तर काय.. ती सकाळी हॉटेलमध्ये आले पासून बंद असलेला त्या शेजारचे रूम नं ५०२ चा दरवाजा उघडलेला. त्या रूम नं ५०२ चा उघडलेला दरवाजा पाहून पुन्हा प्रीती न कळत जुन्या आठवणींच्या ओढीने त्या रूमचे दिशेने खेचली जाते. ती त्या रूम जवळ जाते "हॅलो कोणी आहे का??" अशी हाक देते पण काहीच प्रतिसाद नाही मिळत आणि त्या रूममधील लाईट बंद असलेने दरवाजातून तिला आतील काहीच नाही दिसत नसते. मग प्रीती त्या रूममधील लाईटचे बटन लावण्यासाठी आतमध्ये जाते तोच त्या रूममध्ये असणाऱ्या समोरील उघड्या खिडकीतून वाहणाऱ्या थंडगार गुलाबी वाऱ्याने प्रीतीने आपल्या अंगाभोवती लपेटलेली ती शाल खाली पडते आणि त्या रूम नं ५०२ चा दरवाजा अचानक बंद होतो.

 

क्रमशः भाग ८ 

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर

***

Rate & Review

Amruta Devrukhkar

Amruta Devrukhkar 11 month ago

Tejaswini Choudhari
Suvarna Kadam

Suvarna Kadam 11 month ago

Surabhi

Surabhi 11 month ago

PRADIP

PRADIP 11 month ago

you have unbelievable quality sir. वाचकांना कसे अडकून ठेवायचे हाच लेखनाचा उद्देश असतो। and now you had done it. ☺☺?