Rahasyamay stree - 3 books and stories free download online pdf in Marathi

रहस्यमय स्त्री - भाग ३




अमरला कळलं होत , पुजाऱ्याला नेमका काय म्हणायचं होत ते !! अमरने त्यांना हात जोडून नमस्कार केला व मनात ल्या मनात बोलू लागला , " मी माझ्या प्रेमाला वाचायला कोणाचाही जीव घेवू शकतो किव्वा स्वतःचा देवू ही शकतो "!!!!

अमरला आज भयानक असे दुसरे स्वप्न पडले होते !!!
त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले होते . सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला फक्त दफनभूमीतच मिळणार होती , कारण त्याला तो नेपाळी व्यक्ती दफन भूमी मध्येच दिसला होता ... म्हणून त्याने दफनभूमी मद्धे जायचे ठरवले .!!!!

म्हणून इस्पितळा च्या पार्किंग मध्ये ठेवलेल्या आपल्या कार जवळ अमर जाऊ लागला ...

पार्किंग मध्ये पोहचताच त्याला अजून एक धक्का बसला !!! तो आता पूर्ण पणे चक्रावला होता ...

तो इस्पितळाच्या वॉचमेन कडे गेला व त्याला त्याने विचारलं " पार्किंग मध्ये व्हाइट कलर ची फोर्ड फिगो कार पार्क केली होती आता नाही आहे तिथे ???"

यावर वॉचमेन म्हणाला " काय मस्करी करता साहेब , रात्री तुम्हीच घेवून गेला होतात ना !!! "

अमरला काहीच समजत नव्हतं " जे त्याने स्वप्नात बघितल होत ते खऱ्या आयुष्यात घडत होत , त्याला कळून चुकलं होतं की हे त्या रहस्यमय स्त्री चे चक्रव्यूह आहे !!! "

अमर दफन भूमी जवळ जाण्यासाठी रस्त्यावर रिक्षा ची वाट पाहत होता , तेवढ्यात एक बाईक येवून त्याच्या बाजूला थांबली !!!

" अरे अमर तू इथे ??? कोणाची वाट बघतोय ?? अमरचा जुना मित्र विशाल दहाडे ( पत्रकार ) अमरला विचारू लागला

" काही नाही रे तुझी वहिनी इस्पितळात ऍडमिट आहे , काल पासून डॉक्टर प्रयत्न करत आहेत पण रेशमा शुद्धीवर येत नाही आहे"

" मग तू इथे काय करतोयस ?? तुला त्यांच्या जवळ असायला हव !!! " विशाल आश्चर्याने विचारू लागला .

" नाही जरा काम होत म्हणून चाललो होतो ... अमर विषय टाळत म्हणाला ..!!!

विशाल - अस आहे तर मी सोडतो तुला , कुठे जायचं आहे बोल !!!

अमर - " तसं काही नाही , कशाला तुला त्रास मी जातो , तुला उशीर होत असेल तुला कामही असतील , शेवटी पत्रकार माणसं तुम्ही !! ..."

विशाल - " काम तर आहेच आणि होतच राहतील तू बस  सांग कुठे काम आहे तुझ ?? ते काम करूनच जातो .."

अमर - सिद्धार्थ नगर मद्धे .. अस म्हणत तो विशालच्या बाईक वर बसला !!!

( विशाल पत्रकार होता , तसेच त्याला शहरातील लहान सहान व्यक्तीची ओळख होती म्हणून त्या पाच नावात बदल माहिती विशाल कडे मागायची ठरवली . पण काही क्षणा पूर्वी आठवत असलेली सर्व नावे अमर अचानक विसरून गेला . तो खूप आठवायचा प्रयत्न करत होता मात्र त्याला काहीच आठवत नव्हत !! )

अमर नाव आठवतच होता तोवर विशाल ने त्याला विचारले " तुझी कार कुठे आहे ?? विकलीस की काय ?? आज पायी चालत होतास  !!?"

या प्रश्नाचं उत्तर अमर जवळ नव्हत कारण त्यालाच माहिती नव्हत की कार आहे कुठे ! शेवटी काही तरी कारण बनवाव म्हणून त्याने सांगितल
" कार बिघडली आहे " ...

विशाल - बर झाल त्याचं कारणाने भेट तर झाली , नाहीतर राजे तुम्ही तर ईदच्या चंद्रा प्रमाणे आहात !!

विशालच्या राजे म्हणण्याने अमर ला पाहिलं नाव आठवल " राजाराम पाटील" ...
अमर ने वेळ न घालवता विशालला विचारले " तू राजाराम पाटील हे नाव ऐकले आहे का ? म्हणजे यांना ओळखतोस का तू  ?? "

विशाल हसत म्हणाला " ऐकलं पण आहे आणि माहिती पण आहे , आपल्या केसरी लॉज चे मालक आहेत ते , आमच्या पेपर मद्धे त्यांची जाहिरात असते नेहमी !! काय काम काडल त्यांच्या कडे ??? "

येवढं म्हणून विशालने बाईक बाजूला लावली , अमरला काही समजलंच नाही . अमर बाईक वरून उतरला पुढे बघितलं तर तो ही चक्रावला . त्याची कार दफन भूमीच्या बाजूला होती . त्याने खिशात हात टाकला तर कारची चावी सुद्धा त्याला सापडत नव्हती ...

अमर पूर्ण पणे गोंधळला होता . चलाखी दाखवत तो विशालला म्हणाला " धन्यवाद विशाल , आता मी कार मधून जाईन !!! "

यावर विशाल म्हणाला " तुझी तर कार बिघडली होती ना ?? "

हो इंजिन गरम झाल होत ... आता झाल असेल ठीक तू जा मी नंतर भेटतो तुला "

विशाल काहीच न म्हणता तिथून पुढे निघाला .

अमर आपली चावी शोधण्यात व्यस्थ झाला . पण चावी कुठेच भेटत नव्हती , व ना तो नेपाळी व्यक्ती कुठे दिसत नव्हता ...

शेवटी त्याने स्वप्नात झालेला प्रकार आठवला . आणि धावत त्या कबर जवळ पोहोचला ... आणि बघतो तर काय चावी त्याच काबरच्या बाजूला होती .

अमरने चावी उचलली तोवर त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला .
अचानक ठेवलेल्या हातामध्ये अमर दचकला आणि मागे वळून त्याने बघितल ...

..... मागे विशाल होता !!!

काय शोधत होतास इथे ?? " विशालला अमर वर संशय येत होता ,

अमर यावर स्पष्टीकरण देत विशालला म्हणाला " काल कार खराब झाली होती , म्हणून रागाने चावी इथेच कुठे तरी फेकली होती तीच शोधत होतो मिळाली ...

विशाल - बरं आता काम आहेत मला , उशीर होत आहे संध्याकाळी मी वहिनीला बघायला येतोय कुठे जाऊ नकोस ,अस सांगून विशाल तेथून निघून गेला !!
( सकाळी सकाळी रोड वर अश्या अवतारात ...म्हणजे
हाताला लागलेली माती , तसेच मळकट कपडे !!
कार दफन भूमी जवळ पार्क होती ,
या सर्व गोष्टीमुळे त्याला वाटत होत अमरने आपल्या बायकोला काही केलं तर नसेल ??
हे सर्व विचार विशालच्या मनात घर करत होते )

अमर कार घेवून घरी आला ... मळकट कपडे काढले आणि अंघोळ करायला निघाला . अंघोळ करताना राजाराम पाटीलला कसं मारायचं याचा विचार करू लागला .
कपडे बदलून , डायरी मधील पाच नावांचा फोटो काढला व घरात असलेला फेस मास्क चेहऱ्यावर लावून  बाहेर पडला ...
गूगल मॅप वर केसरी लॉजचा पत्ता शोधला आणि गाडी त्याच दिशेने वळवली !!!

कार लॉज पासून बऱ्याच अंतरावर ठेवली व चालतच लॉज च्या आत जाऊ लागला होता . त्याच्या मनात भीतीच चक्रीवादळ फिरू लागलं होत .
आत जाताच रिसेप्शन वर एक पस्तीशीतला व्यक्ती बसला होता . त्याला अमरने विचारलं " हमे राजाराम पाटील इनसे मिलना हैं "

यावर तो व्यक्ती म्हणाला " मीच आहे राजाराम पाटील , बोला काय काम आहे ?? "

कुछ नहीं शाबजी एक कमरा हवा होता  !!!  अमर नेपाळी व्यक्ती प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत होता .

राजाराम पाटील - " आईडी दाखव " आणि हा मास्क काढ ...

अमर पाकीट मधून बहादुर थापा चे पॅन कार्ड काढून राजाराम पाटील यांना देत म्हणाला . " नही शाब ये मास्क हम नही निकाल सकता , बहुत बिमार है हम ... डॉक्टर ने बोला हैं , मास्क पेहेन के ही बाहर निकलना ...
हमारी वजह से कोई और बिमार ना पडे इसिलीये मास्क पेहना हैं ."

फ्ल्यू लगेच व्हायरल होतात हे राजाराम यांना चांगलच माहिती होत . म्हणून काही जास्त विचारपूस न करता अमरला समोरची खोली दिली ...

अमरची नजर मात्र बाजूला असलेल्या कुंडीवर होती " त्याची इच्छा होती कोणी नाही तोवर ती कुंडी राजारामच्या डोक्यात टाकावी आणि पळून जावं " पण त्याची हिम्मत होत नव्हती ....

शेवटी अमरने एका दिवसाचे भाडे ७५० रुपये दिले व  आपल्या खोलीत प्रवेश केला ..

तो सतत आपल्या बायकोच्या प्राणासाठी हत्या करण्याची हिम्मत गोळा करत होता ...

साधारण खूप वेळा नंतर त्याचा धीर सुटला व तावातावाने तो राजाराम जवळ जाऊ लागला पण तिथे पोहोचताच त्याची हिम्मत पुन्हा एकदा तुटली ... कारण तिथे त्याचे २ वेटर त्याच्या सोबत बोलत होते .

अमरने राजारामला सांगितले " हम काम से बाहर जा रहे हैं .. देर से लौटेंगे , रात में अगर कुछ मंगवाना होगा तो यहां कौन होगा ?? "

" मिच असेन रात्री हे नसतात रात्री , काहीही लागलं तर हा नंबर माझा " लॉज चे कार्ड देत राजाराम म्हणाला ...

" रात को अकेले ही यहा रुकते हो ?? डर नही लागता क्या आपको ??"

" कसली भीती माझच हॉटेल आहे , आणि तसं पण माझा पार्टनर येत - जात असतो !!! "

राजाराम रात्री एकटा असल्याने अमरच्या जीवात जीव आला . त्याला आता फक्त रात्रीची वाट बघायची होती ... म्हणून अमर इस्पितळात आपल्या बायको जवळ जाण्यासाठी निघाला ...

इस्पितळाच्या बाहेर विशाल ची बाईक बघून अमर सावध झाला ... व आपल्या चेहराऱ्यावरचा मास्क काडून खिशात ठेवला....

आत गेल्यावर विशाल आपल्या बायको सोबत रेशमाला बघायला आला होता . व दोघं रेशमाच्या आई सोबत बोलत होते . मला बघताच तो जवळ आला व म्हणाला .
" मी काय ऐकतोय ?? तू सकाळ पासून रेशमा जवळ नाहीस ?? बायको पेक्षा जास्त महत्त्वाचं काय काम आहे तुझं ??? "

अमर मान खाली टाकून म्हणाला " तस नाही रे , माझा जॉब जाऊ शकतो जर ते काम नाही झाल तर , खूप प्रेशर आहे ... "

विशाल - बरं सर्व जाऊ दे , काही लागलं तर नक्कीच कळव ... पैसे वैगेरे कमी पडले तर सांग !!
सुष्माला इथेच सोडून जाऊ का रेशमा जवळ ??

अमर - नाही नाही !! रेशमाची आई आहे . ती घेईल रेशमाची काळजी . तू विचारलस तेच खूप आहे ...

येवढ्या संभाषणा नंतर विशाल तिथून निघून गेला .
रात्री इस्पितळात रेशमाच्या बेडच्या शेजारी नवीन पेशंट भरती झाले होते . पेशंटला बेहोश करण्यासाठी आणलेलं क्लोरोफॉर्म , नर्स ने पेशंटला बेहोश केल्या नंतर बाजूलाच ठेवले होते ...
अमर च्या लक्षात आल्या नंतर त्याने क्लोरोफॉर्म ची बोटल आपल्या खिशात ठेवली ..

रात्री बाराच्या रूटीन चेक - अप नंतर अमर इस्पितळा तून बाहेर निघू लागला . निघताना ऑपरेशन रूम मध्ये त्याला स्केलपेल ( शस्त्रक्रियाविशारद वापरतात तो चाकू ) दिसला . त्याने बाजूला पडलेल्या पेपर मद्धे गुंडाळून त्याला लपवले व कार मधून केसरी लॉज जवळ पोहोचला ...

काही अंतरावर कार लावून लॉज जवळ जावू लागला...व आपल्या खिशातील मास्क तोंडाला लावला....

लॉज मध्ये पोहचला तेव्हा राजाराम रिसेप्शनवर झोपला होता... हीच चांगली संधी बघून त्याने आपल्या जवळील क्लोरोफॉर्म रुमालाला लावून राजाराम
बेहोश करायचा प्रयत्न करू लागला.... पण ह्या प्रयत्नाने रजारामची झोप तुटली व अमरला तो आपल्या दोन्ही हाताने विरोध करू लागला.... राजारामचा केविलवाणा प्रयत्न निष्फळ ठरला व तो बेशुद्ध झाला...
अमरने वेळ न घालवता खिशातील स्केलपेल काडुन दोन - तीनदा त्याचा गळ्यावरून फिरवला...

आज पर्यंत मुंगिही न मारलेल्या अमर ने आज चक्क खून केला होता.... 
राजाराम च वाहणार रक्त पाहून अमरला स्वतःची किळस येवू लागली होती .
त्याला खून करताना कोणीच पाहिलं नव्हत पण स्वतःच मन त्यालाच खायला उठल होत ...

धावत धावत तो आपल्या कार जवळ आला . आपली कार चालवून तो सुमसान रस्त्यावर थांबला . कार मधील असलेल्या पाण्याच्या बॉटल ने त्याने स्केलपेल धुवून साफ केले ... व तो रुमाल तेथे जाळून टाकला .
इस्पितळात पोहचल्यावर स्केलपेल होते तेथे ठेवून दिले आणि रेशमा जवळ येवून बसला .!!!

दिवस भराच्या धावपळीत व मानसिक त्रासा मुळे त्याला कधी झोप लागली कळलेच नाही .
जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा बघतो तर रेशमा. आपल्या बेड वर नव्हती . तो पुन्हा तिला शोधू लागला होता . पण तीच समोरून चालत येत होती ...
तिला बघून त्याच्या जीवात जीव आला .

रेशमा त्याचा जवळ आली.. व त्याचा खांद्यावर हात ठेवून म्हणाली " अजून फक्त चार बाकी आहेत..!!!!"

---------- पुढील भाग लवकरच ----------