मुखवटा

  • 9.6k
  • 2
  • 1.9k

मुखवटा चेहेरे से चेहेरे, जब उतरने लगे। आईने मे असली, किरदार दिखने लगे। या वर्षात खूप काही अप्रिय घटना घडल्यात...सगळ्यांसोबतच.... माझ्याही आयुष्यात गेल्या काही महिन्यांत काही 'छोटी मोठी' वादळ येऊन गेली...वादळ म्हटल्यावर छोटी मोठी कशी असायची, हो ना ?? तर छोटी मोठी यासाठी म्हणते कारण मनुष्याचा हा स्वभाव आहे जेंव्हा कोणी आपल्याला त्याच दुःख सांगत असतो तेंव्हा आपण मात्र आपलं दुःख त्याच्या दुःखापेक्षा किती सरस आणि वरचढ आहे हे सिद्ध करून दाखवण्यात बिझी असतो...त्यामुळे मी हे मान्य करते की माझ्या आयुष्यात जे प्रोब्लेम असतील ते इतर लोकांच्या तुलनेत नक्कीच कमी असतील...त्यामुळे छोटी मोठी वादळ बोलली...हां, पण एक खासियत या वादळांची