ए बाई सीतादेवी घ्या नको म्हणू न....

  • 5.5k
  • 1.3k

ए बाई सीतादेवी घ्या नको म्हणू न.... शिर्षक वाचून बुचकळ्यात पडला असाल ना... हो हे उदगार माझ्या आईचे आहेत जे साडे पाच वर्षांपासून माझ्या कानामध्ये अगदी खणखणत होते. साडे पाच वर्षांपूर्वी माझ्या लाडक्या लेकीच्या - आराध्याच्या बारशाचा सोहळा रंगला होता. सगळं घर नातेवाईकांनी भरलेलं होतं. माझ्या बाळांचं इटूकलंस रूपडं खूप गोड दिसत होतं. अगदी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, सीता या सर्व देवी बालपणी अशाच असाव्यात असं वाटून गेलं क्षणभर. बारशाचा सोहळा सुरू झाला. आपल्या संस्कृती नुसार मुलींसाठी पाच वेळा वेगवेगळ्या देवींची नाव घेऊन पाळण्यावरून देऊन पाळण्याखालून काढण्याची पद्धत आहे. तसं आराध्याची आत्या एका बाजूला आणि एकीकडे मावशी अशा दोघी उभ्या राहिल्या