माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 19

  • 5.7k
  • 2
  • 3.3k

१९ समरभूमीकडे कूच! काही असो, कालच्या पातकाचे प्रायश्चित्त झाले म्हणून मी निश्वास सोडला. खरे सांगू तर वायफळ आणि निरर्थक बोलण्यात माझ्याशी स्पर्धा करणारे कोणी नसेल पण इथे आल्यावर हिला बघून मी आतापर्यंत ब्लॅंकच होत आलो होतो. बहुधा ते आता संपले. मग मी माझ्या भाग्याचा हेवा करत बसलो. काय सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात अशा सुंदर साथीने.. हे क्षण असेच फ्रीझ करून ठेवावेत.. लेखक वगैरे असतो तर मनाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवावेत असे म्हटले असते.. असा विचार करत बसलो आणि तिथेच परत फसलो. कारण पुढे काय बोलावे सुचेना मला. मी तिच्या हातावरल्या मेंदीकडे पाहात बसलो.. काही वेळ गेला असावा. मग