भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १९

  • 4.1k
  • 4
  • 1.6k

" गुरुजी .... माझे आजोबा सांगायचे मला , त्यांच्या गावाच्या गोष्टी.... मोठ्ठ गाव होते, बाजूला दोन नद्या १२ महिने वाहत असायच्या. आजूबाजूला डोंगर... ", पूजा पुढे काही बोलणार तर गुरुजींनी मधेच तिचे वाक्य तोडलं आणि स्वतः बोलू लागले. " गावात मोठी मोठी झाडे.... सुखाने नांदलेले गाव... शेत जमिनींनी फुललेलं गाव... वाऱ्यावर डोलणारे गाव .... बरोबर ना " पूजा हरखून गेली." हो ... हो ... हेच .... तेच ते गावं.. तुम्हाला कस माहित ... हे असे माझे आजोबा वर्णन करायचे ... " ," आजोबा ... !! महाद्या.... हा..... महादेव नाव त्याच .... वाड्यातल्या महाद्याची नात का तू .... " गुरुजी आठवून