भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ६)

  • 4.8k
  • 1.9k

" कोण कुठे निघालं आहे ? " अमोल आला तितक्यात. अमोलला काहीच सांगायच नव्हतं. तो आला समोर, काय सांगावं... सुप्री समोर प्रश्न.." काही नाही सर , फिरायला निघायचा प्लॅन करतो आहे. ... पिकनिक... " ," wow !! very nice.. जाऊ या ना सगळेच... कुठे जायचे आहे... मी सुद्धा येतो... " अमोल खुशीत बोलला. आली का पंचाईत . अमोलला काय सांगावं आता. तरीही सुट्टी घ्यावी लागेलच ना, जायचे असेल तर... " हि माझी मैत्रीण कोमल... travelling करत असते. ती निघाली होती पुन्हा... तर तिच्यासोबत जायचा विचार होता. " संजना अडखळत बोलली. " चालेल ना... जाऊया सर्वच... कोण कोण येणार आहे ते ठरवा. मी पप्पांची