दत्ताकाका!

  • 6.7k
  • 1.2k

दुटांगी पांढरधोतर, वर पांढरा सदरा, डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी, अन बगलेत धरलेली आडवी छत्री, या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही. दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ. वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान. त्याचे आई वडील प्लेगात गेले. जाताना ' रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ' असे वचन घेतले होते म्हणे. ते आमच्या वडिलांनी म्हणजे, अण्णांनी मरे पर्यंत पाळले. अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला! दत्ताकाकांचे आणि आमचे शेत लागूनच होते. तो ते दोन्ही बघायचा. वर्षाचा काय माल असेल तो गाडीत घालून आणून द्यायचा. नौकरी मुळे अण्णांना शेती कडे