आखाडा - भाग १

  • 2.8k
  • 1.1k

भाग १ - आखाडा प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. दरवर्षी प्रमाणे पंचक्रोशीतली सर्वात मोठी होणारी मल्हारी मार्तंडाची मानाची जत्रा मुढाळ गावात भरली होती. कुस्तीच्या आखाड्या भोवती लोकांची गर्दी उसळली होती. भापकर पाटलांचा पोसलेला मल्ल यशवंत मैदानात मोठमोठ्याने आरोळ्या अन शड्डू ठोकत होता. मागील चार पाच वर्षांपासून जत्रेत होणाऱ्या कुस्तीच्या दंगलीत यशवंत अजिंक्य होता. पंचक्रोशीमध्ये अजून त्याच्या तोडीचा मल्ल गवसलेला नव्हता. यशवंतचा सामना करण्यासाठी मैदानात एकही पैलवान यायला तयार नव्हता. एका बाजूला चार पाच धनगरांची पोरं एकाला बळेबळे