मुक्ती दूत !

  • 11.9k
  • 1
  • 3.5k

या विशाल पिंपळ वृक्षा खाली, जो विस्तीर्ण दगडी चौथरा बांधला आहे, तेथे आज कोणाचा तरी दशक्रिया विधी चालू असल्याचे, मी बसलोय त्या जागेवरून दिसत होते. मयताचे जवळचे नातेवाईक उद्देशहीन नजरेने तो विधी ते पहात होते. झाडापासून जवळच एक छोटी नदी वाहते. लहानश्या घाटाच्या रेखीव पायऱ्या, नदीच्या किनाऱ्या लगत उतरतात. हा नदीचा घाट अशाच विधी साठी उपयोगात येतो. घाटाच्या वरच्या बाजूस एक महादेवाचे मंदिर आहे. मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली