‘भाई : व्यक्ती की वल्ली’

(27)
  • 11.8k
  • 2
  • 2.9k

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ 'भाई' अर्थात सगळ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे.. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आपल्या लिखाणाने वाचकांच्या मनावर राज्य केलेला लेखक. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ पूर्वार्ध हा चित्रपट पाहाण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत. खर तर पुलंविषयी किती आणि काय बोलवं हे सुचत नाही. इतक अप्रतिम व्यक्तिमत्व होत पुलंच! पु.ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, बहुरंगी, बहुढंगी कलाकार आणि तमाम महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लेखक अशी त्यांची ओळख पिढ्यान् पिढ्या आपल्या मनावर कोरली आहे. ‘भाई’ म्हणजेच पु.ल. खऱ्या आयुष्यात कसे होते हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येकाला आहे आणि हेच कुतूहल ‘भाई’ मधून उलगडून जातं.पुलंच्या आयुष्यातील प्रत्येक