Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 01-May-2026 08:42am

3 views

#ठंडा_ठंडा_कुल_कुल
Ice Tea ☕
थंडगार मसालेदार चहा

साहित्य
चहा पावडर चार चमचे
साखर एक चमचा
एक लिंबू चतकोर तुकडे करून
इंचभर आले
मूठभर पुदीना पाने
चार बर्फाचे क्यूब

कृती
दोन कप पाणी उकळून
त्यात चार चमचे चहा घालावा
एक चमचाभर साखर घालावी
पाच मिनिटे चांगले उकळून
थंड झाल्यावर गाळून घ्यावा
चहाचे ग्लास थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये एक तास ठेवावेत ठेवावेत
लिंबू चतकोर फोडी चिरून
आले बारीक तुकडे करून घ्यावे
ग्लास बाहेर काढून त्यात प्रथम
लिंबाचे तुकडे घालावे
लाटण्याने ग्लास मध्येच थोडे चेचून घ्यावे
त्यावर आले तुकडे घालून असेच बारीक चेचून घ्यावे
वरती पुदीना पाने हातानेच चुरगळून
टाकावी व ती पण थोडी चेचून घ्यावी
चार तुकडे बर्फ टाकून त्यावर चहाचे तयार पाणी ओतावे
स्ट्रॉ घालून प्यायला घ्यावे

अँटी ऑक्सिडेंट
फ्रेश
थंडगार आणि
आले लिंबू पुदीना यामुळे मेंदू आणि मन तरतरीत करणारा हा चहा
उन्हाळयात एक दिवस आड तरी घ्यावा

0 Comments

Related Videos

Show More