Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 30-Mar-2026 01:13pm

58 views

#ठंडा_ठंडा_कूल_कूल
🟢कैरीचे पन्हे(आगळ)
या दिवसात कैऱ्या छान मिळतात
आणि रोजच थंड काही प्यावे असे वाटते
प्रत्येक वेळी कैरी उकडून
पन्हे करण्या पेक्षा
असे आगळ (batter) करून ठेवले की
मनात येताच पन्हे करता येते

🟢आमच्या बागेतल्या झाडाच्या कैऱ्या आता चांगलेच बाळसे धरू लागल्या आहेत
काही कैऱ्या रस्त्यावर हाताला येतील अशा सुद्धा आहेत
मग कोणालाही चोरून न्यायची इच्छा होणारच 😀😀

🟢अशा बाहेर डोकावणाऱ्या चार कैऱ्या काल काढल्या
आधी धुऊन देवापुढे ठेवल्या
दोन कैरीचे आगळ करून ठेवले

🟢यासाठी कैऱ्या उकडून घेतल्या
थंड झाल्यावर हाताने गर काढून घेतला
(गुठळ्या असतील तर हातानेच मोडून घेणे
पन्ह्या मध्ये कैरीच्या गराच्या रेषा छान लागतात 🙂)
नुकतेच केरळ मधील वेलदोडे मागवले होते
शिवाय काश्मीरचे केशर घरी असतेच..
आवडीप्रमाणे वेलदोडे पावडर, केशर काडी घालून
मिसळून चांगले एकत्र करून
स्टीलच्या डब्यात फ्रीज मध्ये ठेवले
केशर वेलदोडे नको असल्यास सुंठ पावडर वापरता येते

🟢प्यायला देताना गार पाण्यात एक मोठा चमचाभर गर घालून
आवडत असल्यास बर्फाचे खडे घालून..
आवडी प्रमाणे गुळ अथवा साखर व मीठ घालून घेता येते
हे मिश्रण आठ दहा दिवस फ्रिज मध्ये चांगले राहते
(फक्त हे फ्रिजर ला ठेवू नये पांचट होते)

0 Comments

Related Videos

Show More