Marathi Motivational videos by Vivek Vishwanath Shinde Watch Free

Published On : 09-Sep-2025 06:03am

2.1k views

भुमीपुत्रा कसा आहेस..?

काल एक व्हिडिओ पाहिला Top 10 richest surnames of India 2025 -

Singh, Rao, Doshi,
Shah, Mehta, Goenka,
Jain, Patel,
Agarwal, Gupta…
(Due respect to all of these sincere people)

मनात एकच विचार आला – *“आपला मराठी माणूस कुठं गुंतला..? की माझ्या माणसाची गुंतवणूक चुकली ?”*

गोष्ट टोचणारी आहे !!
कडू आहे पण खरी आहे

आपण आजही जुंपलो गेलोय कुणबी दाखल्या च्या मोहात.. असेल गरजेची.. मी विरोध नाही करत..

पण आज खरी गरज आहे मराठी मुलांनी उद्योजकता स्वीकारायची आणि wealth creation ची.

आपल्या DNA मध्येच मेहनत आहे, जिद्द आहे, धडपड आहे.

पण आजचं रणांगण तलवारीचं नाही, तर भांडवलशाहीचं आहे.
जग जिंकायचं असेल तर पैसा - technology - ai - social media आणि market ची भाषा बोलावीच लागेल.

मराठी माणूसा तुला हे आधुनिक युद्ध जिंकायचंय..?तर मग रणांगण गाठावं लागेल

भविष्यात श्रीमंत आडनावांच्या यादी मध्ये मराठी माणसांची नावे झळकली पाहिजे

गर्व आहे मी मराठी असल्याचा
जय महाराष्ट्र !!

विवेक शिंदे । सिद्धराज ग्रुप । कोल्हापूर

0 Comments