Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 17-Apr-2025 01:35pm

117 views

☘️ कैरीची कढी

☘️वेगवेगळया भागात या कढी ला वेगवेगळी नावे आहेत
कैरीच्या सिझन मध्ये ही कढी आठवड्यातून दोन वेळ तरी झालीच पाहिजे 🙂

☘️थंडगार आंबट गोड अशी ही कढी या उन्हाळ्याच्या दिवसात तन मन तृप्त करते 😋

☘️साहित्य
कैरीच्या साल काढून केलेल्या मध्यम आकारातील पाच सहा फोडी
एक वाटी ओले खोबरे
मुठभर धने
एक चमचा जिरे
चार लाल मिरच्या
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा तिखट
गुळ आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणा नुसार
मीठ चवीप्रमाणे
मोहरी हिंग मेथी दाणे फोडणी
साजुक तूप दोन मोठे चमचे
(तुपामुळे ही कढी जास्त चवदार होते)

☘️कृती
प्रथम
खोबरे ,धने, जिरे ,हळद, लाल मिरच्या
याचे थोडे पाणी घालून सरसरीत वाटण करून घ्यावे

☘️पातेल्यात तूप टाकून मेथी दाणे घालावे
वर मोहरी हींग घालून फोडणी करावी
कैरीच्या फोडी त्यात गुलाबी रंगावर परतून घ्याव्या
त्यावर तीन वाट्या पाणी घालावे
थोडे तिखट मीठ व गूळ घालून
मिश्रण उकळू द्यावे

☘️चांगली उकळी आली की तयार वाटण त्यात घालावे
चांगले हलवून परत पाच सहा मिनीटे उकळून घ्यावे

☘️कैरीच्या फोडी शिजून वर तरंगू लागल्या की गॅस बंद करावा
चिरलेली कोथिंबीर घालावी

☘️ही कढी फ्रीज मध्ये गार करून भाता सोबत खावी
नुसती चमच्याने खायला सुध्दा छान लागते🙂🙂

0 Comments

Related Videos

Show More