Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 11-Jan-2025 09:58am

75 views

🟡#संक्रांत_विशेष
🟡#गोड_धोड
🟡गुळपोळी..

🟡खमंग खुसखुशीत गुळपोळी सर्वानाच आवडते
विशेषतः थंडीच्या दिवसात गुळपोळी पौष्टिक पण असतें आणि चविष्ट लागते
संक्रांत आणि गुळपोळी याचे एक खास नाते आहे
प्रत्येकाची गुळ पोळी करायची वेगवेगळी पद्धत असते
ही माझ्या पद्धतीची गुळपोळी 😊

🟡साहित्य

पारी साठी
एक वाटी कणीक
पाव वाटी मैदा (मैदा वापरल्याने पोळी पातळ लाटता येते)
चवीनुसार मीठ
गरम तेल मोहन घालण्यासाठी

🟡सारण
एक वाटी किसलेला गुळ
अर्धी वाटी डाळीचे पीठ तुपात खमंग भाजुन
दोन चमचे खसखस
वेलदोडे पावडर
थोडेसे मीठ

🟡प्रथम कणिक व मैदा मीठ घालून आणि कडकडीत तेलाचे मोहन घालून भिजवून घ्या
फार घट्ट नको फार सैल नको

🟡सारणासाठी किसलेला गूळ किंचित मीठ, तुपात भाजलेले व गार केलेले बेसन पीठ व भाजलेली खसखस ,वेलदोडे पावडर घालून चांगलें मळून घ्या
एक चमचा तूप घालून मऊ करून घ्या.

🟡सारण व पारी याचा घट्टपणा एकसारखा हवा
भिजवलेल्या पीठाचे गोळे करा तसेच सारणाचेही गोळे बनवून घ्या.

🟡पीठाचे दोन गोळे घ्यावेत.
एका गोळ्याएवढा गुळाचा गोळा घ्यावा.
दोन्ही पाऱ्या छोट्या छोट्या लाटून घ्यावा. पहिल्या पारीवर गुळाची पारी आणि त्यावर पुन्हा कणकेची पारी ठेवावी. कडा दाबून पिठीवर पातळ पोळी लाटावी.

🟡पोळी हलक्या हाताने लाटावी आणि कडेपर्यंत सारण पसरले आहे हे बघावे .
सारण कडेपर्यंत पसरले नाही तर कातण्याने पोळीचा कडेचा भाग कापून घ्यावा.
ही पोळी लाटताना मैदा वापरून लाटा.
मैद्यामुळे पोळी पातळ लाटली जाते

🟡तवा गरम करून त्यावर पोळी भाजून घ्या.
तूप सोडून खमंग भाजा अथवा
खाताना भरपूर तूप घ्या
पोळी खमंग भाजावी नाहीतर गार झाल्यावर मऊ पडते.
पोळी चिकटू नये म्हणून भाजताना तव्यावर थोडेसे तेल सोडू शकता.

0 Comments

Related Videos

Show More