Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 10-Jan-2025 09:05pm

40 views

#मटार_एक्सप्रेस

मटार कचोरी

तेलात जिरे घालुन
बारीक चिरलेली मिरची घालावी
त्यात मटार घालुन झाकण ठेवून वाफवून घ्यावे
खाली काढल्यावर
पाव भाजी मॅशर ने बारीक करून घ्यावे
यात साखर मीठ आल्याचे तुकडे कोथिंबीर ओले खोबरे घालुन मिसळून घेणे
आवडीनुसार लिंबू पिळावे
हे झाले तयार सारण..

पारी साठी एक वाटीभर मैद्यात चवी प्रमाणे मीठ
व थोडा ओवा घालावा
तेलाचे कडकडीत मोहन घालून
घट्ट पीठ भिजवावे व झाकुन ठेवावे

तासाभराने त्यांचे लिंबा एवढे गोळे करावे
लाटी पातळ लाटावी
त्यात सारण भरुन गोलाकार द्यावा
गरम तेलात मंद आचेवर तळावे
खुसखुशीत व चविष्ट होतात

या कचोरीचे सारण भरताना मी त्यात एक चीजचा तुकडा स्टफ केला आहे

0 Comments

Related Videos

Show More