Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 30-Dec-2024 08:31am

19 views

#मटार_एक्स्प्रेस
🫛मटार सिझन मध्ये🫛
अनेक वेळेसकेल्या जाणाऱ्या..सर्वांच्या आवडीच्या
मटार करंज्या
All Time Hit 🎯
And Feveret...❤️

🫛ओल्या मटारच्या करंज्या 🫛

सध्या हिरवागार कोवळा मटार खुप छान मिळतो
या मोसमात मटार करंजी निदान तीन चार सहा वेळेस तरी करायलाच हवी 🤗

🫛साहित्य

कणिक एक वाटी,
एक चमचा डाळीचे पीठ
तिखट मीठ ओवा हळद आवडीप्रमाणे
सारणांसाठी
मटार पांव किलो
ओली मिरची ठेचून
आल्याचे अगदी बारीक काप, ओले खोबरे, कोथिंबीर ,मीठ साखर, लिंबू

🫛 कृती
प्रथम कणिक व डाळीचे पीठ यात तिखट मीठ हळद व ओवा चवीनुसार घालून कडकडीत मोहन घालावे
व पीठ भिजवून ठेवावे .

🫛हिंग मोहरीची फोडणी करून त्यात प्रथम बारीक ठेचलेली मिरची घालून परतावे
नंतर मटार घालून ते मऊ होईपर्यंत छान वाफ आणावी
यानंतर त्यात ओलेखोबरे, मीठ, साखर ,लिंबू ,आल्याचे बारीक तुकडे व कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे
सारण गरम असतानाच पावभाजीच्या मॅशर ने अर्धवट चिरडून घ्यावे किंवा मिक्सर ला थोडे जाडसर फिरवावे .

🫛नंतर नेहेमीप्रमाणे करंजी तयार करून त्यात सारण भरून मुरड
घालून घ्यावी आणि तापलेल्या तेलात मंद आचेवर टाळून घ्यावी

🫛छान खुसखुशीत चवदार करंजी खायला मजा येते 😋

0 Comments

Related Videos

Show More