Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free
Published On : 03-Dec-2024 03:08pm41 views
कुर्ग खाद्यभ्रमंती ..
माडीकेरी जिल्ह्यातले कुर्ग ज्याला कोडगू असेही म्हणले जाते
कोडगू हा तिथला एक समाज आहे .
हिरव्यागार वन संपत्तिने नटलेले हे गांव म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्या सारखे वाटते असे म्हणणे चुकीचे नाही.
उंच सखल रस्ते असणारे हे देखणे गांव ..
आकाशातून सतत वेगवेगळ्या आकाराचे ढग पळत असतात .
संध्याकाळी या रंग बेरंगी ढगांची अवर्णनीय शोभा पाहायला
सगळे राजाज सीट नावाच्या पॉइंट वर जमतात .
हवा अतिशय शीतल आणि आल्हाददायक
मैसूर कुर्ग प्रवास तर अतिशय रमणीय आहे .
रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच झाडांची मोठ मोठी जंगले
अधून मधून मसाल्याच्या बागा
कॉफीचे मळे .. त्या बागांतील कच्या पिकल्या फळांचा येणारा मंद सुगंध ..
तिकडे गेल्यावर पारंपारिक स्थानीय पदार्थ
(लोकल फूड )मिळणारे हॉटेल कोणते असे विचारले असता कोडगू किचन नावाचे एक लहान हॉटेल सुचवले गेले .
मला तिथे मिळणाऱ्यां पूट्टू बद्दल फार आकर्षण होते
हे हॉटेल नवरा बायको दोघेच चालवतात
बायको स्वयंपाक करते व नवरा इतर व्यवस्था .
तुम्हाला मिळणारा प्रत्येक पदार्थ ताजा व गरम मिळवा
हीच खटपट ..
इथे लोकल फूड मध्ये शाकाहारी लोकाना फारसा चॉइस नाही
पण मांसाहारी लोकाना मासे ,पोर्क चिकन इतर अनेक चॉइस आहेत .
इथला मासा मेंगलोर येथून येतो .
बांबूच्या कोंबाची भाजी चांगली मिळते ती खायची होती .
पण या मोसमात ती मिळत नाही .
आम्ही शाकाहारी म्हणून दोनच पर्याय होते एक म्हणजे पनीर
आणि दुसरे मशरूम . आम्ही मशरूम पसंत केले .
काही वेळातच आमच्या समोर गरमा गरम कुर्ग टाइप
मसाल्यात तयार झालेली मशरूम भाजी आली .
सोबत आणखी एका छोट्या वाडग्यात छोट्या फोडी असलेले काहीतरी दिले होते
हे काय विचारता फणसाचे लोणचे आहे असे समजले .
दोन्ही ची चव अतिशय मस्त .
सोबत खाण्यासाठी तिथे पांच तांदळाचे प्रकार होते
राईस बॉल किंवा कुर्ग स्टाइल कदंबट्टू ..
तांदळाच्या रव्याची उकड काढून त्याचे छोटे छोटे गोळे करून
वाफवले होते
चव इडलीच्या आसपास जाणारी.. मस्त होते
अककी रोटी ..
तांदळाच्या पिठाची भाकरी किंवा फुलका
अतिशय पातळ म्हणजे अगदी कागदा प्रमाणे
ती सुद्धा मालकांनी अगदी ऐन वेळ गरम आणली
गार झाल्यावर त्याचा स्वाद नाही असे त्यांचे म्हणणे .
अप्पम..
तांदळाच्या पिठाचा मध्यभागी थोडा जाड
आणि कडेला पातळ पण अतिशय मुलायम हा एखाद्या
थोड्या खोलगट पात्रासारखा दिसणारा प्रकार
चविष्ट होता ..
इडि अप्पम ..
हा प्रकार मात्र भन्नाट वाटला
तांदळाची उकड काढून कुरडई सोरईतून काढून वाफवलेला
अतिशय मउ मुलायम आणि बारीक धागे असलेला हा प्रकार खाताना मजा येत होती..
नीर डोसा...
हे म्हणजे तांदळाच्या पिठाचे मऊ डोसे
हे आपण आपल्याकडे सुद्धा हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा खातो
पण यांचा प्रकार खूप अलग आणि चवदार
एकतर तिथला तांदूळ थोडा वेगळा आणि चिकट पणा कडे झुकणारा..
तो स्वछछ धुवून वाळवून त्याचा रवा अथवा पीठ केले जाते.
त्यामुळे त्याची चव आणखी वाढत असणार .
इतके मनसोक्त जेवल्यावर ..
नंतर ताजा ताजा करून दिला जाणारा तुमच्या पसंतीच्या फळाचा फ्रूट जूस ..
पोट तुडुंब भरते ..
बाकी इथे उडुपी हॉटेल्स भरपूर आहेत
सर्व प्रकारचे अगदी चविष्ट डोसे, इडली ,उडीद वडे मिळतात
साऊथ इंडियन थाळी खूप छान मिळते ..
मसाल्याच्या बागा असल्याने सर्व मसाले उत्कृष्ट आणि शुद्ध मिळतात ..
उत्तम प्रतीची व विविध चवीची कॉफी जी तुमच्यासमोर दळून देतात तीही अप्रतिम
बाजारपेठेत फेरफटका मारताना अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आढळल्या ..
हाताने वापरता येणारा बॉडी मसाजर
वेग वेगळ्या फळा पासुन केलेलीं वाईन
उत्तम प्रकारची चॉकलेट
चंदन बॉडी स्क्रबर
चंदन तेल
हेड मसाजर
चंदन लाकूड खोड
रक्त चंदन खोड
साऊथ इंडियन पापड
कुर्ग मसाले
एक सेमी पेक्षा छोट्या अतिशय तिखट मिरच्या
धुवून वाळवलेल्या तांदळाची मऊ शुभ्र पिठी
गुलाबाच्या सुकावलेल्या पाकळ्या ज्या गोड अथवा तिखट पदार्थ किंवा पेयात वापरता येतात
बांबू शूट ची लोणची
सुकवलेले आल्याचे काप
कमल काकडी सारखा दिसणारा पदार्थ होता
तो काय आहे हे समजेना ..
तरीही विकत घेतला तो बेकरी पदार्थ निघाला .

- Shows Videos
- Speeches Videos
- Natak Videos
- Comedy Videos
- Shabdotsav Videos
- Poem Videos
- Sangeet Videos
- Web Series Videos
- Short Films Videos
- Talk Show Videos
- Romantic Videos
- Comedy Film Videos
- Suspense Videos
- Sci-fi Videos
- Motivational Videos
- Social Videos
- Drama Videos
- Action Videos
- Horror Videos
- Sahityotsav Videos
- Song Videos
- Saurashtra Book Fair Videos
- Josh Talks Videos
- Children Stories Videos
- Story Videos
- Mushayra Videos
- Book Reviews Videos
0 Comments