Marathi Motivational videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 24-Nov-2024 12:23pm

39 views

कढीलिंब चटण्या

🌿कढीलिंब स्पेशल 🌿
कढीलिंब चटण्या
घरच्या बागेत कढीलिंबाची🌿 झाडे आहेत
भरपूर कढीलिंब 🌿लागतो.
आमच्या या झाडाचे वाण असे आहे की चव व वास अप्रतिम आहे .
🌿रंग हिरवागार ....पाने पण मोठी मोठी
नुसता वारा सुटला तरी वास पसरतो....
तोडून घेतला की बराच वेळ हाताचा वास जात नाहीं 🙂🙂
निसर्गाचे देणेच म्हणा ना..,🙏❤️

सर्वच झाडांची आमचे अहो चांगलीं निगा ठेवतात 🙂🙂
वेळच्या वेळी कटिंग घेतलें जाते आणि फुटवे सांभाळले जातात...
आजूबाजूला मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळीकडे या कढीलिंबाचे वाटप सतत चालूच असते 😃

भाजी ,कढी, आमटी ,भडंग, चिवडा अशा अनेक पदार्थात रोज वापर असतोच.
अगदी पदार्थ करायला पातेले ठेवले की बागेतून ताजी पाने तोडून टाकायची🙂🙂
कढीलिंब चटणी जेवणात नेहमीच असते

🌿 प्रकार एक
साहित्य
दोन मोठ्या वाट्या भरुन कढीलिंब पाने असतील तर
अर्धी वाटी तीळ
एक चमचा लाल तिखट.
अर्धी वाटी शेंगदाणे
पाव वाटी जिरे

कृती
प्रथम थोड्या तेलात कढीलिंब कुरकुरीत तळून घ्यावा
त्यातच तीळ आणि जिरे भाजुन घ्यावे
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साले काढून घ्यावेत
आता हे सर्व साहित्य चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून मिक्सर वर बारीक करावे .
🌿 ही चटणी जास्त बारीक वाटून त्यांची पावडर करू नये
🌿 भरड वाटली असता चवीला जास्त चांगली लागते
फायबर चा ही लाभ होतो
व खाताना त्यात घातलेल्या प्रत्येक घटकाची चव जाणवते

🌿प्रकार दोन
कढीलिंब हिरवी चटणी (बीन लसणाची)
या कढीलिंबाची 🌿 चवीष्ट अशी ही हिरवीगार चटणी पण बऱ्याच वेळा करते
या चटणी साठी भरपूर 🌿 कढीलिंब पाने हवीत

🌿 साहित्य
पाच ते सहा डहाळी कढीलिंब
पाव वाटी तीळ
पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
पाव वाटी कोरडे खोबर कीस
चमचाभर जीरे
दोन मोठया मिरच्या
मीठ चवीनुसार

🌿 कृती
कढीलिंब पाने थोडया तेलात कुरकुरीत करून घ्यावी
त्यात कोरडे खोबरे कीस भाजून घ्यावा
हिरव्या मिरचीचे तुकडे करून ते सुद्धा भाजून घ्यावे
कढीलिंब, कोरडे ,खोबरे कीस ,शेंगदाणे , हिरवी मिरची मिक्सर च्या भांड्यात घालून चटणी वाटावी
याचा रंग हिरवा येतो

🌿 ही चटणी
कोरडी
दही घालून
अथवा तेल घालून
कशीही छान लागते
पोळी भाकरी डोसा इडली वडे कोणत्याही पदार्था सोबत चांगलीं लागते
पंधरा दिवस चांगली टिकते

0 Comments