Marathi Motivational videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 22-Nov-2024 09:53am

12 views

व्हेज सॅन्डविच
🧇 व्हेज सँडविच.

🧇सँडविच बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आहे
जगभरात सकाळी ब्रेकफास्ट ला सँडविच खाणाऱ्या लोकांची संख्या अफाट आहे

🧇हा पदार्थ जसा बाहेर हौसेने खाल्ला जातो तसाच अनेक घरात सुद्धा बनवला जातो
हा पदार्थ पोटभरू म्हणून सुध्दा खाता येतो
संध्याकाळी स्नॅक्स साठी पण उत्तम आहे

🧇सँडविच बनवणे ही प्रत्येकाची क्रियाशीलता आणि रसिकता असते

🧇यात अनेक प्रकारच्या भाज्या चिरून किसून घालता येतात
मात्र यासाठी दोन गोष्टी अती आवश्यक...
पावाच्या स्लाइस वर लावली जाणारी हिरवी चटणी..
आणि सँडविच वर लावली जाणारी लाल चटणी अथवा सॉस..

🧇यासाठी हवा स्लाइस पाव
कोल्हापूरात मोठ्या आकाराचा पाव सँडविच ब्रेड म्हणुन स्पेशल मिळतो
याच्या आकारामुळे अनेक भाज्या किंवा अनेक भाज्यांच्या अथवा फळांच्या चकत्या यात स्टफ करता येतात

🧇मी प्रथम ब्रेड स्लाइस आतून लोणी लावुन झाल्यावर हिरवी चटणी लावली
ही चटणी मी नारळ कोथींबीर मिरची वापरुन केली आहे
पुदिना कोथिंबीर मिरची सुध्दा वापरून करता येते
ईतर अनेक प्रकारे सुद्धा करता येते
यामधे वापरले जाणारे स्टफ्फिंग सुद्धा अनेक प्रकारे केले जाते
मी कांदा स्लाइस,काकडी स्लाइस, टॉमेटो स्लाइस ,गाजराचा कीस आणि उकडलेल्या बटाट्याचे स्लाइस घातले आहेत
यात चिकन पिसेस, फिश स्लाइस सुद्धा वापरता येतात
अगदी गोड जाम, लोणी लावून आत गोड फळांचे तुकडे पण यात घालता येतात
🧇सँडविच म्हणजे उकडलेला बटाटा स्लाइस हवेच 😊

🧇मात्र यासाठी वापरला जाणारा ब्रेड फार ताजा उपयोगी नाही 😊
स्टफ्फिंग पूर्ण झाल्यावर वरती लोणी आणि चटणी लावलेला दुसरा स्लाइस ठेवून थोडे प्रेस करून कडेच्या कडा कापून घेतल्या
आणि मग मधल्या भागाचे चौकोनी तुकडे करून
वरती खजुर चिंच चटणी लावली
इथे टोमॅटो सॉस पण वापरू शकता
आजकाल या चटणीवर बारीक शेव पण घालतात

🧇सँडविच मध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज काहीही पदार्थ अथवा भाज्या वापरू शकता
त्यासोबत गरम कॉफी मात्र मस्ट बर का...😊

0 Comments