Marathi Motivational videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 21-Nov-2024 10:13am

11 views

अननस हलवा
🍍अननस हलवा

हिवाळा सुरू होताच आहारात अशा गोष्टींचा समावेश केला जातो ज्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीर उबदार राहते.
अशाच एका चवदार पदार्थाचे नाव आहे अननस हलवा. त्याची गोड आणि आंबट चव जिभेला रुची आणते

🍍साहित्य

पाव किलो खवा
अननस (फोडी बारीक तुकडे करून)दोन वाटया
अर्धी वाटी साखर
तूप दोन चमचे
पिवळा रंग दोन थेंब
पिस्ते बदाम काप
तळलेले काजु पाच सहा
वेलदोडे पावडर

🍍कृती
अननस फोडीचा मधला भाग काढून कडेच्या भागाचे बारीक तुकडे करून घ्या
पॅन गरम करून त्यात तूप घालून अननस तुकडे मंद आचेवर परतून घ्या
त्यातील पाण्याचा अंश संपेपर्यंत परतावे लागेल

🍍जेव्हा मिश्रणाला बुडबुडे यायला लागतील तेव्हा दोन थेंब पिवळा खायचा रंग घाला.
(फक्त अननस परतून तो पांढरा दिसतो रंगामुळे हलवा खुलून दिसतो)
यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या.

🍍शिजत आला की साखर घाला
साखर वितळल्यानंतर त्यात खवा बारीक करून घाला घाला आणि मंद आचेवर ढवळत राहा.
हलवा तळाशी चिकटू नये याची काळजी घ्या.

🍍पुर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करा.
शेवटी वेलदोडे पूड घालून एकत्र करून घ्या
चविष्ट अननस हलवा तयार आहे 😋
यात तळलेले काजु बदाम पिस्ते काप घालून
गरमागरम खायला घ्या

0 Comments