Marathi News videos by Hari alhat Watch Free

Published On : 02-May-2021 05:01pm

417 views

https://youtu.be/zPPy5yPMSZY

नवी मुंबई मधील तुर्भे येथील एम आय डी सी मध्ये एका कलर कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास बालाजी कलर कंपनीला आग लागली .ही आग बाकीच्या तीन कंपन्यांपर्यंत पोहोचली. कलर कंपनीला लागलेली आग पसरल्यानंतर बाजूच्या बेकरी व इतर कंपनीने देखील पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून अग्निशमन दलाने आगीतून दोन कामगारांची सुटका केल्याची माहिती समोर येत आहे.

सुदैवाने या आगी मध्ये कोणतीही जीवतहानी झालेली नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळलेलं नाही. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे जास्त कामगार कंपनीत उपस्थित नव्हते या मुळे मोठी दुर्घटना टळली. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र . नवी मुंबई

0 Comments

Related Videos

Show More