Marathi News videos by Hari alhat Watch Free

Published On : 01-May-2021 12:03am

309 views

उल्हासनगर शहरात दिनांक ३० एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार दीलीप मालवणकर यांच्या हस्ते मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आली. डॉक्टर, नर्स, पोलिस महापालिका कर्मचारी , तसेच शहरात लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्यासाठी पुढे येत आहे एन यु जे महाराष्ट्र राज्याध्यक्ष शीतलताई करदेकर. यांच्या मार्गदर्शनाने आणि स्वाभिमान पोलिस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन काळात उल्हासनगर या ठिकाणी मोफत रिक्षा प्रवासाची सेवा सुरु केली आहे.
अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्यांना वाहने वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन करून सध्या तीन रिक्षा मोफत सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती एन यू जे महाराष्ट्र अध्यक्षा शीतलताई करदेकर व साप्ताहिक स्वाभिमान पोलीस मित्र संपादक प्रवीण एस वाघमारे यांनी दिली

0 Comments

Related Videos

Show More