Marathi Funny videos by मच्छिंद्र माळी Watch Free

Published On : 13-May-2019 06:06am

109 views

" पांडुरंग हरि !"
|| नमो श्री फोंडकणदेवी मुंबादेवी जगन्नाथाय् ||
|| जनाची गाथा || " बारा हजार अभंगांचा संकल्प "??
( दैनंदिनी एक )
प्रारंभ, दि. १२/१२/२०१७.

क्र. ५१७) दि. १२/५/२०१९.

दुध देता तरी गाय म्हणे बरी |
नाही तरी दारी कसायाच्या ||१||

मिळता सन्मान प्रेमे आलिंगण |
नाही तरी दुषण सज्जनासी ||२||

धनिकाचे घरी करिती चाकरी |
बळे होती वैरी अव्हेरिता ||३||

म्हणे जनार्दन स्वार्थासी लागुन |
भजती रे जन एकामेका ||४||

भावार्थ-
काही लोक असे आहेत की दुध देणाऱ्या गाईला बरे म्हणतील व न देणाऱ्या गाईस कसायाच्या हाती देतील.

जेथे सन्मान मिळेल तेथे प्रेमाने आलिंगन देतील व जेथे सन्मान मिळत नाही त्याची निंदा करतील भले मग तो सज्जन असो.

एखादा धनीक दिसला की चाकरा प्रमाणे त्याच्या मागे पुढे हिंडतील परंतु त्याने जर त्यांना दुर केले तर मात्र ते त्याच्याशी वैऱ्या प्रमाणे वागतील.

जन हे सत्य धर्मनीती सोडुन जेथे आपले स्वार्थ साधेल तेथे तेथे त्या लोकांचे प्रेमी किंवा पुजारी होत आहेत व एकमेकाला व्यवहारिक रित्या पाहत (भजत) आहेत.

धन्यवाद !!
?????????
|| जय जय पांडुरंग हरि ||

जनार्दन राऊत महाराज निरोमचे कृत- "जनाची गाथा"
????????

|| जय जय पांडुरंग हरि ||

सत्य गुरुकृपासार | हाची माझा अधिकार ||१||
नाही वाउगे कवित्व | दोन तपाचे साक्षीत्व ||२||
अनादी निर्मळ झरा | आदिनाथ परंपरा ||३||
संती जैसा अनुभव | तैसा वर्णिला मी देव ||४||
जनार्दन म्हणे द्यावा | काय आणिक पुरावा ||५||
? ????????

भाविक वाचकहो आपली साथ अशीच रहावी !!

धन्यवाद !

सिध्दनाथ सद्गुरु जनार्दन राऊत महाराज निरोमचे, मु.पो.निरोम, ता. मालवण, जि. सिंधुदूर्ग. अध्यात्मिक सेवा मंडळ (मुंबई) प्रस्तुत-

" प्रामाणिकपणा हाच खरा परमार्थ होय "
" मराठी कविता सादरीकरण " [ video]
********************************
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

0 Comments